मन मनात गुंफून आले सखया दारी
तूज जड होईल ते नकोच मजला आहे
हे भान ठेऊनी मी उंबरठ्यावर आहे
बीज साठवते रे गुपीत उद्याचे सारे
मग, गंधीत होती वसंतातले वारे
फुलऊन मनाची बाग, राग गाताना
स्वप्नास पाहिले असे खरे होताना
संसार सुखाचे इंगित हेच असावे
जे एक दुजाच्या भावातून उमलावे
नरेंद्र प्रभू
संसार सुखाचे इंगित हेच असावे
ReplyDeleteजे एक दुजाच्या भावातून उमलावे.... वा!छानच.
kya baat hai
ReplyDeleteभानस, धन्यवाद.
ReplyDelete'स्त्री' मनातील गुपीतं हळुवारपणे मांडलीत, खुपच छान !
ReplyDeleteविजयजी, असं खरच वागणार्याला हा सलाम आहे.
ReplyDelete