हे झि सा रे ग म प चे गुणी कलावंत द म्युझिशियन्स ही वाद्यमैफल गेले काही दिवस रसिकांसाठी सादर करीत आहेत. आल्पावधीतच या कार्यक्रमाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग आज पार्ल्याच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर होत आहे. महेश खानोलकर (व्हायोलिन), अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (किबोर्ड,अँकॉर्डीयन, पियानिका), आर्चिस लेले (तबला), निलेश परब (ढोलक, ढोलकी, जेम्बे), दत्ता तावडे (ड्रमसेट, ऑक्टोपॅड) असे एकापेक्षा एक मातब्बर वादक असून पुष्क़र श्रोत्री यांच्या निवेदनाने कार्यक्रमला अधिकच बहार येईल. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मी पाहिला आहेच. आज हा पन्नासावा प्रयोग पाहिन आणि नंतर या प्रत्येक कलाकारावर पोस्ट लिहिन म्हणतो. तो पर्यंत सा....रे... ग... म... प...
Masai Mara National Reserve
-
Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya,
contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania.
Ma...
5 years ago
बरेच वादक हे सहाय्यकाच्या भूमिकेतच खुलतात. त्यांनी स्वतंत्र कला सादर करण्याचा मोह टाळलेला बरा. गंमत म्हणून किंवा त्यामार्गे जास्त पैसा सुटतो म्हणून आपला कार्यक्रम करायला हरकत नाही, आणि पैसे देऊन लोक येत असतील तर काहीच करायला कधीच हरकत नसते. अगदी क्रिकेटच्या सामन्यात १००-१५० रुपयांना पाण्याची बाटली देतात म्हणे.
ReplyDeleteकाटेकोरपणे पाहिल्यास काही कलाकार स्वतंत्र कला सादर करतच नाही. उदा. वसन्तराव आचरेकर सोलो वाज़वत नसत. त्यांनी फक्त वसन्त देसाईंचा संच आणि पुढे कुमार गंधर्व (आणि भीमसेनसारखे दिग्गज) यांना साथ केली. गोविन्दराव टेंबे यांचा पेटीवादक म्हणून दबदबा होता; पुढे त्यांनी पेटीवादन सोडल्यातच ज़मा होतं, कारण कंठसंगीतापुढे वाद्य किती अपुरं आहे याची सतत ज़ाणीव. मात्र त्यांची आर्थिक बाज़ू भक्कम होती, म्हणून हा निर्णय त्यांना परवडणारा होता.
हे पोस्ट आधी का नाही टाकलं? आम्हाला हा प्रयोग बघायचा होता.
ReplyDeleteहो जरा उशीरच झाला. पण लवकरच दिनानाथला दूसरा प्रयोग लागेल.
ReplyDeleteनानिवडेकर साहेब, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. स्वतत्रपणे काला सादर करू नये असं कुठे आहे? जुन्या काळात ते शक्य नव्हतं एवढच.
ReplyDelete> हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.
ReplyDelete>
हे मान्य आहे पण दुय्यम दर्जाला अवास्तव महत्त्व येता कामा नये. ते संगीतक्षेत्रात झालं आहे, आणि राजकारणात तर फारच झालं आहे.
> स्वतत्रपणे काला सादर करू नये असं कुठे आहे? जुन्या काळात ते शक्य नव्हतं एवढच.
>---
कलेत स्वतंत्र सादर करण्यासारखा प्राण असेल तर अवश्य करावी. 'ज़ुन्या काळात' काय आणि कसं शक्य नव्हतं, हे मला कळलेलं नाही.
‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला तरी पटत नाही.
ReplyDelete> ‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला तरी पटत नाही.
ReplyDelete>---
यावर मी मत देऊ शकत नाही. पण एक ढोबळ विधान करतो - वादनाला फार मर्यादा आहेत. अमर ओकांची बासरी मला खूप आवडते. पण ती गाण्याचा एक भाग म्हणूनच. पूर्ण गाणं त्या बासरीवर मला आवडणार नाही, असा आज़वरचा अनुभव आहे. तालवाद्यही मला साथीलाच आवडतं. स्टॅनफ़र्ड युनि.मधे एक बाई बासरीला वाहिलेल्या आहेत. त्यांच्या शिष्यगणाची ती पाश्चात्य वादनाची रीतही मला आवडली नाही. बासरीचा प्राणच मर्यादित आहे. प्रभाकर ज़ोग, रमाकान्त परांजपे हे लोक फार तयारीचे आहेत. पण त्यांचेही स्वतंत्र कार्यक्रम मला कण्टाळवाणे वाटतात.
म्हाणूनच म्हटलं, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे
ReplyDelete