‘टिंग्या’ हा चित्रपट अवघ्या मराठी मनाला भावला, महाराष्ट्राला आवडला. या चित्रपटाचा नायक टिंग्या मात्र वास्तवात चित्रपटात दाखवला आहे त्याहून अधिक हालाखीच्या परिस्थितीत दिवस कंठत होता. चित्रपट पुर्ण झाल्यावर आणि तो प्रदर्शीत झाल्यावर लोकांच्या नजरा टिंग्याकडे म्हणजे शरद गोयेकर कडे वळल्या, त्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राजकारण्यांनी त्याला लाखोंच्या देणग्या जाहिर केल्या. हे राजकारणी महा कावेबाज, देणग्या जाहिर करतात पण देत मात्र नाहीत. अजून जाहिर झालेल्यापैकी काही दोणग्या टिंग्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत.
चित्रपटात टिंग्या एका झोपडीवजा घरात राहतो असं दाखवलं आहे. पण वास्तवात शरद गोयेकर पालावर रहात होता. गेल्या वर्षी आपल्या मायबाप सरकारने त्याला उदार होऊन दोन गुंठे जमीन दिली. (इकडे रसकार मधलेच काही मंत्री आणि आमदार घर घर करत फिरत असताना त्या शरद गोयेकरला कोण देणार घर?). या ब्लॉगवरून राजकारण्यांवर सतत टिका होत असते पण आज राजकिय नेता असलेल्या राज ठाकरेंच कौतुक करावसं वाटतं. त्यांनी टिंग्याची अडचण दूर केली. राज ठाकरेंनी टिंग्याला घर बांधून देण्याची घोषणा केली. आमदार शिशिर शिंदेंना त्याची जबाबदरी सोपवली. आठ महिन्यांच्याआत सिमेंट कॉंक्रीटचं पक्क घर बांधून तयार झालं. आज ते आठशे चौरस फूटाचं टुमदार घर शरद गोयोकरच्या हवाली करण्यासाठी खुद्द राज ठाकरे राजुरी (ता. जुन्नर) येथे गेले आहेत. हे एकीकडे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करून घर लाटणार्या मंत्र्यांना आणि आमदाराना घराच्या चाव्या द्यायला निघाले होते. आता सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी न करता ती घर त्याच मंत्र्याना देण्याचं घाटत आहे. अशी ही घर काळजाला घरं पाडतात. एकी कडे करूणेने आणि दुसर्या बाजूला रागाने.
No comments:
Post a Comment