11 May, 2010

कुणी घर देता, का घर?


(एक बातमी: म्हाडाचा उद्याचा चावीवाटप कार्यक्रम रद्द
म्हाडाच्या घरांचा वर्सोव्यातला चावीवाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कायद्याला धाब्यावर बसवून मुंबईत एक फ्लॅट असतानाही काही नेत्यांनी म्हाडाचा आणखी एक फ्लॅट आपल्या नावावर करून घेतला सर्वसामान्यांसाठी बनवलेल्या योजनेवरही या धनाड्य नेत्यांनी हात मारलाय. मुंबईत स्वत:चा प्लॅट असतानाही म्हाडाची घरं लाटणाऱ्या नेत्यांचा पर्दाफाश झाला आहे.)



कुणी घर देता, का घर?
आम्हा दोनशे एकवीस आमदाराना
कुणी घर देता, का घर?

आमदार निवासाच्या खोल्यात रहाणं
आता आम्हाला सोसवत नाही
मंत्री असलो तरी ते पद केव्हा जाईल
सांगता येत नाही, ......म्हणूनच म्हणतो
कुणी घर देता, का घर?

प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार
तसा आमच्या घरातल्या प्रत्येकाला
घराचा अधिकार ......म्हणूनच म्हणतो
माझं घर असलं तरी माझ्या घरातल्या प्रत्येकाला
कुणी घर देता, का घर?

आम्हीही कधीतरी म्हातारे होणार
नव्हे आमच्या पेकी कित्येकजण म्हातारेच आहेत
तेव्हा आहे त्या घरातून बाहेर पडल्याबरोबर
दूसर्‍या घरात जाण्यासाठी
कुणी घर देता, का घर?

अरे म्हाडा कोणासाठी लोकांसाठी ?
की या लाखांच्या पोशिंद्यांसाठी ?
वरळीला चालेल, झालचतर वर्सोव्याला चालेल
कुठेही चालेल, पण कुणी घर देता, का घर?
 
म्हाडाची गाय तर आमच्याच दावणीला बांधलेली
कसायाला म्हणूनच ती धार्जिणी झालेली
घराची चावीसुद्धा अशी हाताजवळ आलेली
पण तेव्हढ्यात कुणीतरी शिंकलं! आता.... ते घर?
ते घर...? कुणी घर देता, का घर?



10 comments:

  1. अगदि मस्त झाली आहे कविता...

    ReplyDelete
  2. देवेन, लेख लिहायला गेलं तर पुरे पडणार नाही म्हणून हे लिहीलं.

    ReplyDelete
  3. अगदी मस्त जमली आहे कविता.

    जमवलेल्या गुंडांना राहयला घेतली असतील.तसे हि हि जमात फलाट मद्ये राहणारी नाहीत.

    ReplyDelete
  4. काय सांगणार! 'राम नाम जपना, पराया माल अपना' असच सगळं चाललय.

    ReplyDelete
  5. सागर, धन्यवाद.

    ReplyDelete
  6. कविता तर छानच झालेय पण या राजकारणी सांडाच्या पेकाटात सनसनीत लाथ घातलीत. त्या बद्दल मनापासून अभिनंदन.
    आपल्या देशाला आतंकवाद्यां पेक्षा जास्त धोका भारतीय राजकर्त्यांपासून आहे.

    ReplyDelete
  7. विजयजी, सहमत.

    ReplyDelete
  8. हे आमदारांनी व मुख्यमंत्र्यांनी वाचायला हवे. त्यांची त्यांनाच लाज वाटेल

    ReplyDelete
  9. हरेक्रिष्णजी, मला वाटतं ते कितीतरी अधिक निर्लज्ज आहेत.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates