कैलास-मानस यात्रा ही तमाम भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय
आहे. निसर्गाचं ते अफाट रूप याची देही याची डोळा पाहण्यासाठी सारी धडपड चालू असते.
भारतातून उत्तरांचलाच्या दुर्गम भातून ही यात्रा करताना अनेक अडचणी नेहमीच येत
असतात. (भारत सरकारतर्फे नेण्यात येणारी यात्रा याच मार्गे नेण्यात येते.) तो द्रविडीप्राणायाम टाळण्यासाठी नेपाळच्या
काठमांडू इथे जावून पुढे कोडरी- न्यालम-न्यु-डोंगपा-च्यु-गुंफा करत कैलास गाठायचं
म्हणजे रस्ते चांगले असले तरी फार लांबचा प्रवास करावा लागतो.या पुर्ण प्रवासाला
तेरा दिवस लागतात. शिवाय या भागात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला पुन्हा त्याच
मार्गे परतावं लागतं.
या वर्षी चिन सरकारच्या अगम्य करभारामुळे यात्रेकरूंना खुप
त्रास सहन करावा लागत आहे. तसा तो नेहमीच होतो असा अनुभव आहे. भरमसाठ फि भरूनही योग्य
वेळी तिबेटमध्ये प्रवेश मिळेलच अशी खात्री देता येत नाही. अशा वेळी यात्रेकरू आणि
त्यांना सेवा देणार्या पर्य़टन संस्थांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय
काय? तर कैलासला जायचे असलेले पर्यायी मार्गे खुले करणे.
भारतातील लडाख प्रांतातून तिबेटमध्ये प्रवेश करून मानसरोवर
जवळच्या मार्गाने गाठता येईल आणि वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.

हे दोन मार्गे खुले झाल्यास चिनला अधिक प्रमाणात परकियचलन मिळेल, तिथला रोजगार वाढेल आणि मुख्य म्हणजे
भारतीय यात्रेकरुंची त्रासातून सुटका होईल. इथे दिलेल्या नाकाशावरूनही मानस किती
जवळ आहे आणि सद्ध्या किती फेरा घालावा लागतो याची कल्पना येते.
अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDelete