27 June, 2014

केंद्र सरकारचे अच्छे निर्णय


मोदींच सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला. 'अच्छे दिन' येण्यासाठी आधी 'अच्छे निर्णय' घ्यावे लागतात हे ज्यांना समजत त्यांच्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची खालील माहिती :

1.
शपथविधीला शेजारील राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना पहिल्यांदाच आमंत्रीत करून शांतता आणि सहकार्याच्या दृष्टाने मोठ
पाऊल. यामुळे भारताच्या 152 मच्छिमारांची
बिनशर्त सुटका. एवढे काँग्रेसला दहा वर्षात 
सोडवता आले नाही.
2.
उशीरा येऊन लवकर जायची सवय लागलेले
उच्च नोकरशहा आता लवकर येतात आणि
उशीरा जातात. दिलेली जबाबदारी वेळेतच
पुर्ण करायला प्रथमच बांधील. नाही केल तर
'कारणे दाखवा नोटीस'. 
3.
अधिकारर्यांना निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य,जरी
निर्णय चुकले तर मोदी स्वतः राहणार जबाबदार.
नाहीतर महाराष्ट्रात 70,000 करोडच्या सिंचन
घोटाळ्यात फक्त अधिकारी दोषी आणि नेते
निष्कलंक...???
4.
देशाची विजेची गरज भागवण्यासाठी
अत्यावश्यक असलेले जे प्रकल्प केवळ
काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडले होते
अशा 22,000 करोड रूपयांचे प्रकल्प मार्गस्थ.
5.
रस्ते निर्माणासाठी 40,000 कोटींचे नवे
प्रकल्प. दिवसाला 30 किमी रस्ते बांधायच
ध्येयच नाही तर नियोजनसुद्धा. त्याचबरोबर
रस्त्यांच्या कडेला 200 कोटी झाडे लावणार
पर्यावरण मंत्रालय.असा ताळमेळ काँग्रेसच्या
काळात फक्त पैसे खाण्यासाठीच दिसला.
6.
भांडवलदारांचे सरकार म्हणून हिणवल्या
गेलेल्या मोदींनी ऊस ऊत्पादक शेतकरी आणि
त्यांचे सहकारी कारखाने जगावेत म्हणून साखर
आयातीत 15 पासून 40 टक्क्यांपर्यंत भाववाढ
केली,कारखान्यांची कर्ज फेडण्याची मुदत
वाढवली जेणेकरून त्यांना शेतकर्यांना वेळेवर
पैसे देता येतील. 'किधर है अच्छे दिन?' अस
विचारणारे आता का शाबासकी देत नाहीत..??
7.
ईंधनात 5 वरून 10 टक्क्यांपर्यंत ईथेनाँल
मिश्रणाची परवानगी देऊन देशाचे $1.5 अब्ज
म्हणजे 9000 कोटी रूपये वाचले.पेट्रोलमाफिया,
तेलमाफिया यांच्या दबापुढे झुकणार्या काँग्रेसला
हे जमल नाही.
8.
डबघाईला आलेल्या देशाची संपत्ती असलेल्या
रेल्वेला वाचवण्यासाठी लोकांचा रोष असुन सुद्धा
भाडेवाढ केली जेणेकरून नवीन प्रकल्प मार्गी
लावावे, रेल्वेची सुरक्षा वाढावी. केवळ मतांवर
डोळा ठेवून कसही सत्तेत रहायच राजकारण
करणार्या काँग्रेसला का नाही जमल??? मग
त्यात देशाच वाटोळ झाल तरी चालेल.
9.
देशात नव्याने 8 'IT Manufacturing
Centre' स्थापन करायला परवानगी दिली.
यातून हजारो नोकर्या ज्यांना मिळणार 
त्यांच्यासाठी'अच्छे' की बुरे दिन हे आपणच
ठरवा.
10.
APMC Act मधून फळे आणि भाजेपाल्या
रद्द करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना
आता त्यांचा माल दलालांशिवाय बाजारभावाला
विकता येणार. हे अच्छे कि बुरे दिन..??
11.
परदेशातील कोणत्याही वैज्ञानिक
संमेलनासाठी आता मंत्री अधिकारी नाही तर
खरोखरचे शास्त्रद्न् जाणार.
12.
कोणत्याही मंत्र्याला,खासदाराला स्वतःचे
नातेवाईक सचिव म्हणुन ठेवता येणार नाहीत.
काँग्रेसचे पवन बन्सल यांना आपल्या अशाच
पुतण्याच्या भ्रष्टाचारा पायी राजीनामा द्यावा
लागला.
13.
खासदारांना मोदींनी स्वतःच्या पाया पडायल
बंदी आणली. आपल मतदारसंघाच काम सोडून,
पक्षश्रेष्ठींच्या पाया पडून पडून पाठीचे कणेच
गेलेल्या निष्ठावाऩांना आता तरी अक्कल येईल.??
14.
भारताच्या सीमा बळकट करण्यासाठी
सीमेपासून 50 किमीवर लागणार्या कोणत्याही
कामासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी नाही.
देशाच्या सीमाच बळकट नसतील तर पर्यावरण
चिन्यांसाठी राखत बसायच का?? आणि
सगळ्यांना माहित आहे कि मिलीटरीचे
पर्यावरणाविषयी नियम कडकच असतात.
त्यांच्याभागात जरा जाऊन फिरलो तर फरक
लगेच समजतो.
15.
सामान्य नागरिकांना महाग पण
अत्यावश्यक अशी ओषधे मोफत देणार.
16.
गंगा नदी जिला देशाची जिवनवाहिनी
म्हणतात तिच्या विकासासाठी 40000 कोटिंची
तरतुद आणि स्वतंत्र मंत्रालय हे तेच करू
शकतात जे तिला आई मानतात.
17.
आज राज्यात,देशात दुष्काळाच सावट
असताना आमच्या जाणत्या.?? नेत्यांना अजुन
26 लवासांची स्वप्न पडतात.. पण त्याचवेळी
मोदिंकडे रेल्वेने पाणी पोहचवायची योजना
तयार होत असते.
अजुनही असे निर्णय आहेत आणि हे सगळ
घडलय फक्त 30 दिवसात.
'अच्छे दिन कहा है?' अस विचारणार्यांनो तुम्ही
एक गोष्ट विसरता की त्यासाठी आधी अच्छे
निर्णय घ्यावे लागतात.जी धमक आधिच्या
सरकारमध्ये दिसली नाही म्हणून लोकांनी पाडल
फक्त स्वस्ताईसाठी नाही. लगेच बी लावल
म्हणजे फळ हातात येत नाही. त्यासाठी कष्ट
करावे लागतात जे आपले पंतप्रधान मोदी
घेतायेत दिवसाला 18 तास काम करून.
हो खरोखरच 18 तास. आपल्याच पैशातून
आपल्याला अनुदानाची भीक घालणार्या आणि
ति गरज नसताना घेणार्यांना अच्छे दिन म्हणजे
अनुदानाच्या भिकेवरची स्वस्ताई नसून कष्टाने
निर्माण केलेला विकास आणि पारदर्शक
सुशासन असत हे जेव्हा समजेल तो सुदीन
म्हटला पाहीजे.
जय हिंद.!!!
सौजन्य : Prabhu Kapse

1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates