घे भरारी, उंच भरारी, उंच भरारी घे
तू करारी, तू प्रहारी, तू उभारी घे
असे आजचा दिस हा उत्सवाचा
करी सार्थ वा मुर्त, का कापरे ?
उदासीनतेचा नसे मार्ग साचा
जरी वाटते काय आता खरे ?
नको चिंतू आता उद्याच्या क्षणांचे
करी मोकळे हास्य आता बरे
नको रात्र बेरात्र घालू उसासे
जगायास हा निमिष आता पूरे
धुके दाटलेले असेना सभोवती
तुझा एक किरण त्याला पुरे
सरे रात्र अंधार ज्या पावलाने
उषा तूच हो, गगन कर साजीरे
नरेन्द्र प्रभू
छान आहे ! उषा तूच हो , गगन कर साजीरे !
ReplyDeleteआवडली! :)
ReplyDeleteगीतांजली, भानस,
ReplyDeleteआभारी.
नमस्कार सर,
ReplyDeleteखूपच सुंदर कविता,
आपण आपले लेख अधिकाधिक मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी www.marathiblogs.in या संकेतस्थळावर लेखाची लिंक पोस्ट करू शकता.
उत्तम ब्लॉग...
ReplyDeleteआभारी.
ReplyDelete