तुच दिप, तुच तेज
अंतरात दिप ज्योत
धरी प्रकाश, करी प्रकाश
तिमिराचा कर विनाश
उजळो
तन, उजळो मन
उसळो
रवी गात्रातून
तेजपूर्ण
होवूदे
आरास
तुझ्या नेत्रातून
तुच तुझ्या विश्वाचा
भास्कर हो प्रकाशाचा
सुख शांती करूणेचा
दिपस्तंभ आशेचा
वाट
सुकर होईल
शिखरावर
जाईल
यशवंत
ध्वज तुझा
डौलाने
फडकेल
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment