शब्दगाऽऽरवा या श्री. प्रमोद देव यानी प्रकाशीत केलेल्या "महाजालीय शारदीय" अंकात प्रसिद्ध झालेली माझी तू असताना, तू नसताना ही कविता.
तु असताना नाचत असते
फुल पाखरू मोहक सुंदर
तु नसताना मनात माझ्या
दाटून येते धुकेच धुसर
तु असताना दरवळतो तो
सुगंध तनीचा वातावरणी
तु नसताना तजेलाच तो
निघून जातो कसा ग सजणी ?
तु असताना होतो माझा
क्षण क्षण अती उल्हासाचा
तु नसताना अथांग सागर
बुडवत जातो काळोखाचा
तु असताना संध्या हसते
लाल रुपेरी ढगां आडूनी
तु नसताना मेघाच्छादीत
रवीही जातो असाच बुडूनी
तु असताना चंद्र चांदणे
उगाच हसते तुला पाहूनी
तु नसताना चंद्रकोरही
अशीच जाते झाडां मागूनी
तु असताना तु हसताना
चैतन्यच ते भरून उरते
तु नसताना तु रुसताना
मन पाखरू उदास बसते
नरेन्द्र प्रभू
सप्रेम नमस्कार.
ReplyDeleteकविता वाचली. उत्तम आहे. मी या प्रांतात फार जाणकार नसलो तरी मला आवडली एवढं तरी नक्कीच म्हणू शकतो.
आभारी आहे.
सलील कुळकर्णी
kavita vachali.
ReplyDeletephaarch chcchan.
Borkaranchi athavan zali.
Prasad Kulkarni , Mumbai
नमस्कार
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया आणखी काही लिहायला प्रेरणा देऊन गेली.
धन्यवाद
'मन पाखरु' मनाला झुलऊन गेलं. तुमचे काव्य असेच फुलतं राहो हीच शुभेच्छा !
ReplyDelete-विजय मुडशिंगीकर
kavita farach sunder aahe. ata tumchya photonchya exhibitionla photokali ashya chhotya kavitahi lihit ja. chhan vatel.tumcha purna blogach vachaniya asto.
ReplyDeleteNilima Ravi
Dear Prabhu,
ReplyDeleteYou have wrote your heart out and it clearly shows your feelings and commitment towards your loved ones.
Shishir Datar
शिशीरजी नमस्कार,
ReplyDeleteआपली प्रतिक्रीया खरच बोलकी आहे.
धन्य्वाद