मुंबई पोलिस काय किंवा महाराष्ट्र पोलिस काय सगळं पोलिस ‘खातं’ सध्या चर्चेचा विषय झालं आहे. नुकतच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यांना एक वर्ष पुर्ण झालं. प्रसिद्धी माध्यमांमधून सुरक्षेवर पर्यायाने पोलिस खात्यावर उलटसुलट चर्चा झाली. नोकरीत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी एकेमेकांवर तोंडसुख घेतलं. त्या निमित्ताने पोलिसांमध्ये असलेल्या गटबाजीच प्रदर्शन झालं. राजकारण्यांना लाजवेल अशाप्रकारे आय्.पी.एस्. अधिकारी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. कर्तबगार पण हांजी हांजी न करणारे अधिकारी साईड पोस्टींगला आणि ताटाखालची मांजरं मोक्याच्या जागेवर ही आजची आपल्या पोलिस खात्याची स्थिती. माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर एकेठिकाणी म्हणाले की पोलिसांचा वचक राहिलेला नाही. हुजरेगिरी करण्यात आणि चिरीमिरी घेण्यात गुंतल्याने त्यांचं आपल्या कामात लक्ष नाही. (हल्ली प्रशिक्षणाच्या वेळीच हे शिक्षण सुद्धा दिलं जातं.) पोलिस ड्रेसकोड पाळत नाहीत. टोपी घालत नाहीत. पण आज ती टोपी दुरचित्रवाणीवर वारंवार दिसत होती. त्याचं काय झालं, लातुर सत्र न्यायालयातून एका खुनाच्या आरोपीला पोलिस पुन्हा कारागृहात घेवून चालले होते. वाटेत या कायद्याच्या रक्षकाना भुक लागली, तहान लागली. मग त्या पोलिसानी आरोपीकडे पाहीलं. तो पण भुकेला होता. पोलिसांमधील माणूस (लाचार) जागा झाला. त्यानी त्या आरोपीला घेऊन तहान आणि भुक दोन्ही भागवायचं ठरवलं. ते बार अँड रेस्टॉरंट जवळ आले. त्या आधी त्या आरोपीचा खिसा चाचपला. सरकारी वाहन थांबवलं. बेड्या असताना आरोपीला धड खाता पीता येणार नाही म्हणून त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या. बार मध्ये मटणाचं ताट जेवायला (प्यायलासुद्धा) बसले. जवळच्याच बाकड्यावर बेड्या ठेवल्या, त्यावर टोपी ठेवली. डोळे मिटून उदरभरणाचं यज्ञकर्म करताना मात्र कॅमेर्याने हे दृष्य टिपलं.
आता सांगा हे असे पोलिस कुणाच्या मिठाला जागणार खुन्याच्या की सरकारच्या?
व पु काळेंनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे हे पोलीस खाते नाही हे ओलीस खाते आहे. सामान्यांना वेठीस धरणारे
ReplyDeleteharekrishnaji
सरकारच्या मिठाला जागण्यासाठी सरकार नावाची गोष्ट आहे का? भारतात जनतेने निवडून दिलेले सरकार, नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता, भ्रष्ट्र नेत्या कडून चालवले जाणारे सरकार म्हणजे लोकशाही अशी झालेली आहे.
ReplyDeleteठणठणपाळ, आपण म्हणता अगदी खरं. हे असे राजकारणी अहेत म्हणूनच पोलिस अशी कृत्य करायला धजतात. काही खुनी, दरोडेखोरच आता मंत्री बनलेले आहेत.
ReplyDelete