‘पाणी नाही मिळत तर दारू प्या’ ही महाराष्ट्र सरकारची सद्याची निती दिसते. आजच एका आदेशाद्वारे वर्षाचा शेवट आणि वर्षारंभ या दोन दिवशी बार सकाळी पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा सरकारने दिली आहे. असं या पुर्वी कधी घडलं नव्हतं. पण आता पुन्हा निवडून आल्यावर या मंडळीनी अगदीच ताळतंत्र सोडलेलं दिसतय. ‘खातं’ कोणतही असूदे या मंत्र्याना सदा सर्व काळ मोहात पाडते ती दारू. वन खात्याच्या मंत्र्याला मोहाची दारू. अन्नमंत्र्याला ज्वारी, बाजरी धांन्याची दारू, आणि आता दारुबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्र्याने आपल्या खात्याचं नाव ‘दारू खुली आणि उत्पादन सुरू’ असं केलेलं दिसतय. संपुर्ण राज्यात पाण्याची टंचाई असताना आणि आता दिवस दिवस पाणी गायब असताना दारू मात्र चौवीस तास वाहताना दिसेल. हा पुरोगामी महाराष्ट्र दारूगामी होणार काय ?
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या
नसेल पाणी घोटभरी तरी, चोवीस तास दारू प्या.
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.प्लास्टिक पिशव्यांना बंदी . सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी. आम्ही अंतकवाद्यांचा कठोरपणे मुकाबला करू. चीन बरोबर लढाई करण्यास आम्ही समर्थ. देशातून गरिबी ( गरीब!!) हटवली जाईल. कोणीही उपाशी पोटी राहणार नाही. देशातून भ्रष्टाचार खतम करुत. आमच्या नितीमत्तेला जनतेने मान्यता देऊन आम्हाला निवडून दिले. हिंदीत लिहिलेल्या पत्रांना त्वरित उत्तर दिले जाईल . अमेरिकेला पुरावे देऊन पाकिस्तानला पराभूत करुत.महागाई कमी केल्या जाईल . भारत माझा देस
ReplyDeletesamarpk mandley..
ReplyDelete