नववर्षाच्या पुर्वसंध्येला एक अपुर्व योग आला. त्याचं काय झालं, एका शासकिय अधिकार्याला भेटायचं होतं. आता अशा माणसाला भेटायचं म्हणजे तो, समोरच्या व्यक्तीकडे न पहाता बोलणारा, आडमुठा, नियमांवर बोट ठेवणारा आणि मुख्यता अरसिक असणार हे ठरलेलं. पण या सगळ्या पुर्वग्रहांना छेद देत ती समोरची व्यक्ती चक्क आमच्याबरोबर आमचा मित्र असल्यासारखी बोलायला लागली. नियमाच्या अधीन राहून आमचं काम करण्याचं आश्वासन तर दिलच शिवाय आमच्या योग्य सुचनांचा सन्मानच केला जाईल असं आम्हाला आश्वस्थ केलं. नवीन वर्षाच्या स्वागताला तयार होण्यासाठी सगळे ऑफिस सोडून जाण्यात धन्यता मानत असताना हा सत्पुरूष मात्र आमच्याशी निवांतपणे बोलायला उपलब्ध झाला. आता येवढं सांगितल्यावर कोण हे गृहस्थ असा आपल्याला प्रश्न पडला असणार तर ते आहेत श्री. नविद इनामदार प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे कला अकादमीचे व्यवस्थापक.
नव्यावर्षाच्या पुर्वसंध्येलाच असा शुभशकुन झाल्याने नववर्ष असच उत्साही जाणार यात शंकाच नाही. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेछा.
No comments:
Post a Comment