‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ हा त्रिमितीचा जगण्याची नवी दिशा दाखवणारा महोत्सव दि. १५, १६, व १७ जानेवारी २०१० रोजी रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी ६ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत ‘त्यांच्या स्वप्नांचा प्रवास’ या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, रेणू गावस्कर, मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या अनोख्या मुलाखती झाल्या आहेत. तसेच ‘स्वप्न बघा स्वप्न जगा’ या कार्यक्रमांतर्गत कवी प्रा. प्रविण दवणे व कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या अशा कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून त्रिमितीने रसिकांची आणि मान्यवरांची वाहवा मिळवली आहेच.
आता ‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ या आगामी महोत्सवात पुढिल कार्यक्रम होणार आहेत.
दि. १५ जानेवारी २०१०
आत्मनिर्भर तरूण बनविण्यासाठी कार्यशील असणारे आणि क्रांतिकारी शिक्षणाचे प्रयोग करणारे दापोली – चिखलगावचे डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांची प्रकट मुलाखत. मुलाखतकार – सुधीर गाडगीळ.
दि. १६ जानेवारी २०१०
प्रेरणा, इच्छा, जिद्द जागवणारे ‘अर्थक्षेत्रातील मराठी तारे’ आपल्याशी संवाद साधतील, सहभाग:
डॉ. भालचंद्र मुणगेकर. (माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, नियोजन आयोगाचे माजी सदस्य)
डॉ. रुपा रेगे-नित्सुरे (चिफ इकॉनॉमिस्ट – बॅँक ऑफ बडोदा)
डॉ. आनंद तेलतुंबडे (मॅनेजिंग डायरेक्टर – पेट्रोनेट इंडिया लिमिटेड)
वाय्. एम्. देवस्थळी (सी.एफ.ओ. लॉर्सन अँड टुब्रो लिमिटेड)
सुप्रसिद्ध गप्पाष्टककार संजय उपाध्ये यांचा ‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ या विषयावर सुसंवाद.
दि. १७ जानेवारी २०१०
मेळघाटात आदिवासींमध्ये राहून कार्य करणारे रामेश्वर फड, मधुकर माने, चंद्रकांत जगदाळे, वैभव आगवने आणि प्रियदर्शन तुरे या तरुणांशी संवाद.
मराठी अभिमानगिताच्या ध्येयाने झपाटलेल्या संगीतकार कौशल इनामदार यांची मुलाखत. मुलाखतकार – समीरा गुजर.
याच बरोबर चित्रस्पर्धा, संगीत, नाट्य आणि बरच काही.
सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
श्री. नरेंद्र जी,
ReplyDeleteयांसी सप्रेम नमस्कार.
आपले 'स्वप्नांना पंख प्रेरणेचे' कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. आठवणीने निमंत्रण पाठविल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
पूर्वनियोजित कार्यक्रम व दिनक्रमामुळे इतक्या चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नसल्याची खंत वाटते. आपले प्रेम असेच कायम मिळत राहो, हीच अपेक्षा आणि विनंती.
आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे