आचार्य अत्र्यांच्या नावाने चालवल्या जाणार्या अत्रे कट्टा या उपक्रमाला आज पहिल्यांदाच जाण्याचा योग आला. राजेश गाडे यांच्या निमंत्रणामुळे मी कांदिवलीला गेलो. सावरकर प्रेमी गायक कलाकार सतीश भिडे यांच्या देशभक्तीपर गीतांचा सुरेख कार्यक्रम ऎकता आला. थोडक्या वेळात भिडेंनी सावरकरांचा जीवनपट उलगडून दाखवला. अत्रे कट्ट्याचे कार्यकर्ते तळमळीने काम करत होते पण प्रेक्षकांची उपस्थिती आणखी असायला हरकत नव्हती.
बोरिबली, कांदिवली, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी अत्रे कट्टा चालवला जातो. चांगले कार्यक्रम होतात त्याचे वृतांत वर्तमान पत्रात वाचायला मिळतात पण अत्रे कट्ट्यांची समंवय समिती असणे फार गरजेचे आहे जेणे करून या चार संस्थांना चांगल्या कार्यक्रमांची देवाण घेवाण करता येईल. एकत्र आल्याने अत्रे कट्ट्याची छाप समाजमनावर पडेल.
श्री. नरेंद्र जी,
ReplyDeleteअत्रे कट्टा, कांदिवलीच्या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिल्याबद्दल आणि उपक्रमाबद्दल आत्मीयतेने चर्चा केल्याबद्दल परिवाराच्या सर्व सहभागी-सभासदांच्या वतीने मी आपला आभारी आहे.
आपला स्नेहांकित
राजेश गाडे
मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली