जगभरातील पर्यटकांना हिमालयाची बर्फाच्छदित शिखरे नेहमीच साद घालत असतात. अर्घ्याहुन अधिक हिमालय तर आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. वॉन्डररर्सचे हौशी छायाचित्रकार गेली कित्येक वर्ष हिमालयात भ्रमंती करत आहेत. जम्मु - काश्मीर मधले लडाख, हिमाचल प्रदेश, मधील स्पिती व्हॅली, सिक्कीम. असाम, अरूणाचल प्रदेश मधले तवांग, मघालय, नागालॅन्ड आणि शेजारचा देश भुतान इत्यादी ठिकाणी गेल्या वर्षभरात फिरून काढल्ेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.
हिमाच्छदित शिखरे, गोठलेले तलाव, खळाळत्या नद्या, चोहिकडे, रंगाची रांगोळी असलेला लडाखचा आगळावेगळा प्रांत, हिरवागार अरूणाचल, तळयांच तवांग, अदिम जनजातींचं मेघालय. आणि नागालॅन्ड शांत धिरगंभीर उत्तर सिक्किम, आणि नेत्रसूखद हिरवाई, चिड आणि पाईनचे भले थोरले वृक्ष व त्यातून बागडणाऱ्या नद्या, बौध गुंफा यांचे साम्राज्य असलेले भुतान अशा अनेक ठिकाणची मनोवेधक छायाचित्र या प्रदर्शनात पाहता येतील. या प्रदर्शनामध्ये हिमालयातील निसर्गरम्य स्थळांबरोबरच, तिथली संस्कृती, सण लोकजीवन, या सर्व गोष्टी जनसामान्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न छायाचित्रकानांनी केलेला आहे.
वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची स्थापना श्री. आत्माराम परब यानी हौशी छायाचित्रकरांना हक्कांच व्यासपीठ मिळवून देणे आणि दुर्लक्षित पर्यटन स्थळांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचवणे या हेतुने 9 वर्षापूर्वी केली असून आतापर्यंत अनेक छायाचित्रकाराच्या सुप्त गुणांना वाव दिला आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी आत्माराम परब, तुषार निदांबुर, नरेंद्र प्रभु, विश्वेश नाईक, सुधीर धर्माधिकारी, सुरेंद्र तांबे, मेघन पाटणकर. रेखा भिवंडिकर, गिरीष गाडे. सागर कर्णिक, सुहासीनी मुतालिक आणि स्मिता रेगे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक 3 जानेवारी ते 10 जानेवारी, 2010, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.
या प्र्रदशनादरम्यान हिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक 2 जानेचारी 2010 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे.
अभिनंदन...
ReplyDeleteमी भेट देईन प्रदर्शनाला..
महेंद्रजी,
ReplyDeleteजरूर या, मी वाट पाहत आहे.
धन्यवाद
मस्त मला पण फार आवडते प्रदर्शनांना भेटी द्यायला. कालच पुण्यातील एक 'सन ऍंड सी' नावाचे एक फोटो प्रदर्शन पाहीले. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या कोण्या एका कॅप्टनने त्याच्या कामा दरम्यान भेटी दिलेल्या ९९ देश्यांत दिसलेल्या सुर्यास्ताचे काढलेले फोटो या प्रदर्शनात लावले होते
ReplyDeleteअसो.. अभिनंदन, तुमचे काही निवडक फोटो असलेली एखादी फोटो गॅलरी असेल तर जरुर कळवा
अनिकेत आपल्याला या ब्लॉगवरच 'माझी फोटो बाजी' या लेबलला क्लिक केल्यावर असे फोटो पहाता येतील.
ReplyDeleteप्रिय श्री० नरेंद्र प्रभू यसी,
ReplyDeleteसप्रेम नमस्कार.
आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व समस्त मित्रपरिवाराला नवीन वर्ष व त्यानंतरचा काळही सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो, ही देवाकडे प्रार्थना.
आपल्या अनुदिनीला भेट दिली. तेथील हिमालयाची छायाचित्रे उच्च दर्जाच्या व्यावसायिकाला शोभतील अशीच आहेत. आधी हिमालय हा विषयच मनात सत्यम्, शिवम्, सुंदरम् अशा भावना निर्माण करणारा. त्यात इतकी मोहक चित्रे वेड लावतात.
अत्यंत आभारी आहे.
क०लो०अ०
आपला स्नेहांकित
सलील कुळकर्णी