पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईं आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या अमोल साहित्यकृतीचा ठेवा महाराष्ट्राला रिझवत राहिल यात शंकाच नाही. पु. ल. आणि सुनीताबाईं यांनी त्यांच्या हयातीत अनेक संस्था, व्यक्तिंना मदतीचा ओघ सुरूच ठेवला होता. त्यांच्या पश्चातही पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगासाठी यापुढे कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. कलाकाराच्या मृत्यूनंतर सामान्यत: पन्नास वर्षे कॉपीराईट वारसांकडे राहतो; परंतु पुलंनी लिहिलेल्या सर्व नाटकांचे सुनीताबाई देशपांडे यांच्याकडे असलेले हक्क आता त्यांनी मराठी जनतेसाठी खुले केले आहेत. स्वत: सुनीताबाईंनी लिहिलेल्या सर्व म्हणजे सहाही पुस्तकांचे स्वामित्व हक्क (कॉपीराईट) त्यांच्या अंतिम इच्छेनुसार ‘आयुका’ या पुण्यातील खगोल विज्ञान संशोधन संस्थेला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुलंच्या पुस्तकांचे सुनीताबाईंकडे असलेले कॉपीराईटस्ही सुनीताबाईंनी आयुकाकडेच दिले आहेत.
पुलं व सुनीताबाईंचे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे व भाचे दिनेश ठाकूर यांनी सर्व पुलंप्रेमींसाठी यासंबंधात एक निवेदन प्रसिद्धीसाठी दिले असून, त्यामध्ये सुनीताबाईंच्या या इच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. मोठ्या व्यक्तिंच्या निधनानंतर नातेवाईकात वाटणीवरून वाद सुरू होतात किंवा दिवंगत व्यक्तिची अशी इच्छा पुर्ण करण्यात संबंधीत टाळाटाळ करतात. पुलंच्या या नातेवाईकांनी तसे न करता एक चांगला वस्तूपाठ समाजापुढे ठेवला आहे. तसेच आपल्या पश्चात आपल्या या ठेव्याची एवढी चांगली व्यवस्था लावून सुनीताबाईंनी जगापुढे चांगला आदर्श ठेवला आहे. त्यांना त्रिवार वंदन.
पु.ल. आणि सुनीताबाईंनी त्यांच्या विश्वस्त निधिचे बोधवाक्य "जोडुनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेंच करी। शेवटीही सिध्द केल.
ReplyDeleteकोचर्याच्या प्रभूचा दाभोलीच्या हेमंतला नमस्कार. शेवटी पुल आणि पुली दि ग्रेट हेच खरं.
ReplyDelete