काल त्रिमितीच्या ‘स्वप्नांना पंख प्रेरणेचे’ या तीन दिवसांच्या महोत्सवाचा पहिला दिवस. त्यावर पोस्ट टाकिनच पण त्याच कार्यक्रमात अरविंद सावंत हे आमदार भेटले. क्रांतिकारी शिक्षणप्रयोग साकारणारे डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांची मुलाखत होती. मध्यंतरात आमदार अरविंद सावंत दांडेकर दांपत्याला भेटायला आले. बोलता बोलता राजापूरचा विषय निघाला सावंतानी आपल्या बरोबरच्या सुरक्षारक्षकाला जवळ बोलावलं. “हा सुद्धा राजापूरचा” अशी त्याची ओळख करून दिली आणि गप्पात सहभागी करून घेतला.
हल्लीचे लोकप्रतिनिधी आपण पाहतो. त्यांचा माज पाहतो. पण एक आमदार आपल्याबरोबरच्या पोलीसाला एवढ्या आत्मियतेने, आदराने वागवतो हे बघून खुप बरं वाटलं.
मध्यंतरी आपण दिलेले प्रदर्शनाचे आमंत्रण मी मित्रमंडळींना अग्रेषित केले होते. त्यापैकी काहींनी प्रभादेवीच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि एका उत्तम प्रदर्शनाबद्दल माहिती दिल्याबद्दल माझेच आभार मानले. ती आपल्या अधिकारातील भेट आपल्याला सप्रेम सुपूर्द करतो.
ReplyDeleteSaleel Kulkarni
अरविंद सावंतांचा मला व्यक्तिश: चांगलाच अनुभव आहे. माझी आणि त्यांची ओळख नसतांनाही ते अतिशय आत्मीयतेने येऊन भेटले होते. आपण सगळेच राजकारण्यांना टाकून बोलतो. पण कौतुक करण्यासारख्या गोष्टीची आपण नोंद घेतलीत त्याबद्दल आपले अभिनंदन!
ReplyDeleteकौशलजी नमस्कार,
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याबाबतही मला असाच अनुभव आला होता 'असा ‘मान्य’ राजकारणी' http://prabhunarendra.blogspot.com/2009/09/blog-post_24.html
हे पोस्ट बघा जमलंतर वाचा