पार्ल्याच्या मॅजेस्टिक गप्पा मध्ये नुकताच जगन्नाथ कुंटेंना ऎकण्याचा योग आला. त्यांचं नर्मदेss हर हर हे पुस्तक वाचल्या पासून त्यांना भेटण्याची किमान पाहण्याची इच्छा होती ती या निमित्ताने पुर्ण झाली. विणा देव यांनी घेतलेली कुंटेंची मुलाखत खुपच भावपुर्ण पण रोखठोक अशीच झाली. जगन्नाथ कुंटे म्हणजे अध्यात्माचा जिताजागता ग्रंथच. अमुभूतीचे अनेक प्रसंग त्यानी त्या मुलाखतीत कथन केले. ते त्यांच्या पुस्तकांमधूनही वाचता येतात. अध्यात्माची अनुभूती आल्याशीवाय किंवा श्रद्धा असल्याशीवाय त्यांच म्हणणं कळणार नाही, पण फक्त आठवी पास असलेल्या माणसाने ‘नर्मदेss हर हर’, ‘साधनामस्त’, ‘नित्य निरंजन’ आणि ‘कालिंदी’ अशी चार विलक्षण प्रभावी तसेच प्रचंड खपाची पुस्तकं लिहावी यातच सर्व आलं.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
कुंटेंचे व्याख्यान कोल्हापूरला आयोजित केले होते, तेव्हा त्यांना काही शंका विचारण्याची इच्छा होती पण वेळेअभावी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला नाही. मी परिक्रमा पूर्ण केलेल्या काही लोकांना अनुभव विचारले पण त्यांनी जंगलाचा काही प्रवास बसमधून केला होता. नर्मदेss अगदी वेगळ्या धर्तीवरचे पुस्तक आहे. चांगले आहे.
ReplyDeleteमीनल नमस्कार, परिक्रमेच्या वेळी जंगलाचा काही प्रवास बसमधून करणं म्हणजे उपास आहे म्हणून सांगायचा आणि पोटभर फराळ खायचा त्यातलं झालं.
ReplyDelete