माणसाने काळाबरोबर चालावं म्हणतात. काळ बदलत जातो त्याबरोबर माणसाने बदलणं हेही आलच. सामाजिक रुढी, परंपरा या काही विशिष्ट काळात त्या त्या परिस्थितीनुरूप आकार घेतात. पुढे ती परिस्थिती बदलते, सामाजिक व्यवस्था बदलते तशा त्या रुढी, परंपरा विचारपुर्वक बदलल्या पाहिजेत. विशेषत: लग्न, मुंजी, बारसा असे समारंभ साजरे करताना डामडौल, थाट आणि जेवणावळी यासाठी जो वारेमाप खर्च केला जातो तो करताना किंवा दुसर्याकडून करवताना विचार केला पाहिजे. धनिक मंडळी काहीतरी कारण काढून त्यांच्याजवळ असलेल्या गडगंज संपत्तीचं, श्रीमंतीचं प्रदर्शन करत असतात. त्याना करुदेत पण ते करतात म्हणून त्यांच अनुकरण आपण का करायचं? तसा आपल्यावर आलं की खर्च न करणारे दुसर्याने तो करावा म्हणून आग्रह धरतात. सगळेच श्रीमंत असतात असं नाही. इथे बाजू कुठची एवढाच प्रश्न असतो. मुलाकडची मंडळी वधूपित्याला जमेल तेवढे नागवाण्यासाठी अनेक क्लुप्त्या योजतात. कालच एका लग्नाला जाण्याचा योग आला, मुलाकडची मंडळी माझ्या चांगलीच परिचयातली. एरवी रुपया वाचतो म्हणून पुढच्या स्टॉप पर्यंत चालत जाणारे हे लोक मुलीच्या बाजूने लाटता येतं म्हणून वातानुकूलीत हॉल, हजार रुपयाचं ताट असे थाट करून ऎट मारतात तेव्हा खरच वाटतं काळ पुढे गेला पण रुढी तशाच राहील्या.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 months ago
सर्व तेच आणि तसंच आहे. फक्त बाहेरची रंगरंगोटी काहीशी बदललेली दिसते. पण ओळखायला अडचण पडणार नाही.
ReplyDelete