15 March, 2019

मराठा मंदिर साहित्य पुरस्कार प्रदान


पुरस्कार स्विकारताना लेखक: नरेंद्र प्रभू
ग्रंथाली प्रकाशनाच्या हे प्रवासी गीत माझे, आत्माराम परब यांचा रंजक प्रवास या नरेंद्र प्रभू लिखित प्रवास वर्णनपर पुस्तकाला २०१८ चा मराठा मंदिर साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दि. १४ मार्च २०१९ रोजी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या या दिमाखदार पुरस्कार वितरण समारंभात सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीमद जगदगुरू शंकराचार्य, करवीर पीठ यांनी उपस्थित राहून शुभाशिर्वाद दिले होते, तर जेष्ठ साहित्यिक मा. डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे गाढे आभ्यासक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

हे प्रवासी गीत माझे, आत्माराम परब यांचा रंजक प्रवास हे आत्माराम परब (व्यवस्थापकीय संचालक, ईशा टुर्स) यांच्या देश-विदेशातील दीर्घ, रंजक आणि उत्कंठापूर्ण प्रवासाचा सफरनामा असलेलं वाचक प्रिय पुस्तक आहे. जेष्ठ लेखिका रेणूदिदि गावस्कर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून त्या सदर पुस्तकाविषयी बोलताना म्हणतात:  

पुढे काय....? पुढे काय....? पुढे काय....? अशी तीव्र उत्कंठा वाचकाच्या मनात निर्माण करून त्याला पानांमागून पानांचा फडशा पाडायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे! पुस्तकाचं हस्तलिखित मला मिळालं आणि वाचताना मी अक्षरश: तल्लीन झाले. खरंच हे पुस्तक वाचताना वाचक रममाण होतील अशी माझी खात्री आहे.

या पुस्तकानं कोकणापासून सुरूवात करून देश विदेशाला आत्मारामने घातलेली गवसणी टिपली आहे. त्यातल्या अद्भुतरम्यतेसह जीवनस्पर्शी बारकाव्यांनाही अवकाश दिला आहे. आत्माराम परब नावाचा एक अवलिया प्रवासी झपाटल्यासारखा प्रवासाला निघतो काय, जगातील अनेक देशातील चित्तथरारक अनुभवांनी संपन्न होतो काय वा या अनुभवांची श्रीमंती अगणित लोकांपर्यंत पोचावी अशी मनीषा बाळगतो काय! आणि त्याच्या या लोकविलक्षण भटकंतीत अनेक वेळा सहभागी झालेले श्री. नरेंद्र प्रभू  ते सारं संचित वाचकांपर्यंत जादूई शब्दात पोचवतात काय ? सगळंच विलक्षण आणि भन्नाट. हा सारा प्रवास आणि वाचन प्रवास वाचकाला तल्लीन आणि तन्मय तर करून सोडेलच.

आत्माराम मूळचा कोकणी माणूस. हिरवीगार झाडं आणि लालमातीशी त्याचं जन्माचं नातं. पण हे नातं केवळ या निसर्ग वैशिष्ट्यांपुरतं सीमित रहात नाही. कोकणी माणसाची न विचारता सल्ला देण्याची सवय आणि तिरकस स्वभाव याचं फार सुंदर वर्णन पुस्तकाच्या आरंभी वाचकाच्या भेटीला येतं. नव्हे, त्याचं एक छोटं आख्यानच प्रभूंनी वाचकाच्या भेटीला सादर केलं आहे.

आत्मारामने भटकंतीच्या नादापायी मुंबई कस्टमची उत्तम नोकरी सोडून स्वत:च्या ईशा टुर्स या कंपनीची स्थापना केली. ईशा टुर्सची पहिली कुल्लू मनाली सहल जाहीर झाली. त्याचवेळी आत्मारामला जीवनाचं एक चिरस्थायी सत्य उमगलं, ते म्हणजे व्यवसाय आणि छंद यात महदंतर असतं. या सत्याचा आविष्कार नंतरच्या व्यवसायाच्या भटकंतीत पावलोपावली उपयोगी पडला. या पहिल्याच सहलीत पर्यटक गोळा करण्यापासून ते पुढे ती सहल पूर्णत्वाला नेईपर्यंत ज्या काही अडचणींचा डोंगर आत्मारामला पार करावा लागला त्याचं वर्णन वाचतावाचता  हसू फूटतं आणि हसताहसता डोळ्यांच्या कडा कधी पाणावतात हे समजतही नाही.

पर्यटक म्हणून आत्माराम अनेकदा लडाखला गेला. लडाखच्या निसर्गाशी त्याचं अंतरीचं नातं जुळलं. लडाख म्हणजे आत्मारामसाठी स्वर्गच. ते स्वर्गसुख त्यानं हजारो पर्यटकांमध्ये भरभरून वाटलं. पण २०१० साली ६ ऑगस्टच्या रात्री लडाखवर ढगफुटीने प्रहार केला. या संकट समयी आत्माराम तिथं पोचला. तिथल्या पद्मा ताशी या त्याच्या जिवाभावाच्या लडाखी मित्रासमवेत आत्मारामने तिथे लडाखींना जमेल ती मदत केली. त्या वेळचा तो प्रसंग, मृत्यूचं तांडव आणि निसर्गाचं उग्र रुप हे सारं वाचकांनी मुळातूनच वाचायला हवं.

आत्मारामनं पर्यटकांना सौंदर्य संपन्न देशांची सफर करवली तसंच ग्रामीण भारताचं दर्शन घडवलं. भव्यता आणि नम्रता हातात हात घालून कशा नांदतात ते दाखवलं. ईशा टुर्सचा हटकेदृष्टिकोन यातच स्पष्ट होतो. या प्रवासात आत्मारामला स्मिता रेगे, पद्मा ताशी यांच्यासारखे हे तितकेच ताकदीचे सहकारी लाभले. यांच्या शिवायही आत्मारामवर जीवाभावाने प्रेम कारणारे, त्याला या प्रवासात कळकळीनं साथ देणारे अनेक सहकारी भेटले म्हणून तर ही यात्रा सुफल संपन्न झाली. श्री. नरेंद्र प्रभूंची ओघवती भाषा, वर्णनात्मक शैली आणि विषयाशी एकरूप होण्याची ताकद यांमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. याची ग्वाही मी नक्की देऊ शकते. कारण मीसुद्धा आत्मारामच्या या सफरीतील एक आनंदयात्री आहे. अनेक प्रसंगांची साक्षीदार आहे वा प्रवासातील घुसळणीत जे आनंदाचं नवनीत बाहेर आलं त्याची वाटेकरी आहे. या पुस्तकातील व्यक्तीचित्रं आणि आत्मारामची त्यांच्याशी असलेली अपार मैत्री पाहिली की भारत माझा देश आहे सारे,भारतिय माझे बांधव आहेत असा जात-पात, धर्म,पंथ याच्या पलिकडे जाणारा दृष्टिकोन आपसुकच वाचकाच्या मनात निर्माणाहोते.

पुस्तकाचे लेखक श्री. नरेंद्र प्रभू आपल्या मनोगतात म्हणतात आपल्या कोषातून बाहेर पडण्यासाठी  लडाखसारख्या ठीकाणी आत्माराम परब सारख्याबरोबर गेलं पाहिजे. पर्यटकांच्या सहलीत रंग भरण्यासाठी हा माणूस काय काय कसरती करतो ते या पुस्तकात लिहिलं आहे. आत्माराम परब यांचा जीवन प्रवास हा एखाद्या सुरेल गाण्यासारखा आहे, तो आपल्याला या पुस्तकातून वाचता येईल. हिमालय ते तळकोकण आणि केनिया-टांझानिया पासून स्कँडेनेव्हियापर्यंतचं  प्रवास वर्णन या पुस्तकात विस्ताराने आलं आहे.

2 comments:

  1. Greetings I am so grateful I found your website, I really found you by error,
    while I was looking on Digg for something else, Regardless I am
    here now and would just like to say many thanks
    for a marvelous post and a all round interesting blog (I also love the theme/design), I don't have time
    to read it all at the moment but I have bookmarked it and also included your RSS feeds,
    so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up
    the fantastic job.

    ReplyDelete
  2. Try Baccarat Online which is the most popular casino game simply based upon luck or chance.
    But overall, live game might be the optimum solution for many who desire to have fun playing the games along
    with have plenty of time to go to the actual casinos. Before we
    answer that question, we will need to explore the problems concerning the
    current state in the laws in the US, for the federal and state levels.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates