काल वीर अभिनंदन
पुन्हा भारतभूमीवर परतला. हा वीर पाकिस्तानच्या ताब्यात असल्यापासून तो आता परतला तरी
पाकिस्तानच्या प्ररचारतंत्राची सारी जबाबदारी काही भारतीय प्रसारमाध्यमं, तथाकथीत बुद्धीजिवी, पुरोगामी भामटे आणि
केवळ मोदींना अपशकून करायचा म्हणून स्वत:चं नाक कापून घेणारे दिडदमडीचे राजकारणी
यांनी सांभाळलेली आहे. भारतातले हे अस्तनितले निखारे
पाकिस्तानचा प्रचार पाकला हवा तसा करताना दिसत आहेत. ते आता भारतापुरते मर्यादीत न
रहाता पाकिस्तानच्या टिव्हीवरच जास्त चमकू लागले आहेत. जवळ-जवळ युद्धजन्य स्थिती असताना
आणि आपला एक सैनिक पाकच्या ताब्यात असताना हे लोक खोटा प्रचार करून भारत सरकारला दोन
आघाड्यांवर लढायला भाग पाडत होते. श्रीनगरमध्ये अतिरेक्यांवर कारवायी करताना आपल्या
भारतीय जवानांवर दगडफेक करणार्या शत्रूचीच भुमिका हे निच लोक बजावत आहेत.
सामान्य भारतीयांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, सैन्यदलांबद्दलचा आदरभाव कमी करणे, सरकारच्या कामात बिब्बा घालणे, मानवतेचा राग आळवणे, इअमरान खान किती सभ्य गृहस्त आहे त्याचे दाखले देणे, त्या हेतू शुद्ध आहे असे ठासून खेटे बोलणे, मुख्य म्हणजे पुलवामाची घटना विस्मरणात घालऊन आणि अझर महमुद
व इतर आतंकवादी भारताला सोपवा ही मागणी बाजूला सारून सारं लक्ष वेगळ्याच मुद्द्यांवर
भटकवणं अशी कामं करून आपल्या मनात गोधळ उडऊन देणे, विश्वास नाहीसा करणे ही या बुद्धीजिवी फिदायीन गटाची योजना आहे आणि तेच आताच्या परिस्थितीत पाकिस्तानचं मुख्य
हत्यार आहेत, आपणही ते
बनायचं का त्याचा विचार करा. पोस्ट फॉरवर्ड करायच्या आधी सारासार विचार करा, त्याचा फायदा शत्रू घेणार नाहीना ते पहा, मुख्य म्हणजे लागलं हाताला केलं फॉरवर्ड असं करू नका. आपली ताकद
कमी पडली की समोरच्याचा बुद्धीभेद करायचा ही पण एक रणनीती आहे त्याला आपण बळी पडून
आपल्याचा विरूध्द लढूया नको. आजवर यालाच आपण बळी पडलो आहोत.


No comments:
Post a Comment