23 March, 2019

फुटीर हुरियत नेता गिलानींला १४.४० लाखांचा दंड



हुरियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शहा गिलानी याला सक्तवसुली संचालनालयाने सतरा वर्षे जुन्या प्ररकरणात १४.४० लाख रुपये दंड केला आहे. त्याने त्यावेळी १० हजार डॉलर्स बेकायदेशीररीत्या बाळगले होते. २० मार्च रोजी परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याजवळील ६.९० लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले होते.


गिलानी याच्या श्रीनगरमधील हैदरपोरा भागातील निवासस्थानी २००२ मध्ये टाकण्यात आलेल्या  छाप्यातही परकीय चलन जप्त करण्यात  आले होते. गिलानी याच्याविरोधातील प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने गिलानी यांना दंड करण्याचा निर्णय घेऊन दंडाचा आदेश दिला. गिलानी हा  हुरियत कॉन्फरन्सचा नेता असून तो जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये असतो.

सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या अहवालानंतर दखल घेतली असून गिलानी याला श्रीनगर येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गिलानी याच्या वकिलाने लेखी उत्तर दिले असून त्याच्या निवासस्थानी परकीय चलन सापडल्याचा इन्कार केला आहे. फेमा कायद्यानुसार परकीय चलन व्यवहारात सर्वसाधारण किंवा विशेष परवाना आवश्यक असतो तो न घेता गिलानी यांनी परकीय चलन जवळ बाळगले होते.

गिलानी यांच्याकडे कुठलीही परवानगी नसताना त्याच्या निवासस्थानी छाप्यात परकीय चलन सापडले होते. त्यामुळे त्याला परकीय चलन जप्त का करण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली होती. त्याला स्पष्टीकरणासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली होती. अशीच कारवाई फुटीरतावादी यासिन मलिक याच्यावर होणार असून त्याने परकीय चलन बेकायदेशीररीत्या जवळ बाळगले होते. तो जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचा माजी अध्यक्ष आहे.

आजवर कुठल्याच सरकारने अशी कारवायी केली नव्हती, ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे.  

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates