15 March, 2019

पाकचे पाणी रोखले
भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखल्याचं केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी म्हटलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचं पाणी रोखण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्या दृष्टीनं भारतानं पावलं देखील उचलली. रविवारी अर्जुन मेघवाल बीकानेर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी याविषयीची माहिती दिली. दरम्यान, पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी रोखण्याचा निर्णय भारतानं घेतला होता.

अर्जुन मेघवाल यांनी म्हंटले कि, पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या पूर्व नद्यांमधील ०.५३ मिलियन एकर फिट पाणी अडविण्यात आले आहे. या पाण्याची गरज भासल्यास राजस्थान अथवा पंजाबमध्ये याचा उपयोग पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

पुलावामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर २०० टक्के आयात कर देखील लावला. त्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात धाव घेत दहशतवाविरोधात आवाज उठवला. त्याला चीन, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननं देखील पाठिंबा दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडल्याचं चित्र आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानकडे जाणाऱ्या व्यास, रावी आणि सतलज नद्यांमधील भारताने आपल्या हिस्सातील पाणी अडविण्याचे म्हंटले होते. या पार्श्वभूमीवर सिंधू करारानुसार भारत केवळ आपल्या हिस्सातील पाकिस्तानला जाणारे पाणी अडविणार आहे. यामुळे सिंधू कराराचे उल्लंघन होणार नसल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

काय आहे सिंधू पाणी करार?
 • 1960 साली झाला करार
 • पंडित नेहरू आणि आयुब खान यांच्या सह्या
 • भारत आणि पाकमध्ये पाणी वाटपाबाबतचा करार
 • सिंधू नदीचं ८० टक्के पाणी पाकला मिळतं
 • रावी, बियास आणि सतलज नद्यांवर पूर्णपणे भारताचा हक्क
 • सिंधू, झेलम आणि चेनाबच्या पाण्यावर पाकचा हक्क
 • ३ युद्ध झाली तरी हा करार मोडला नाही
 • जगातला सर्वात यशस्वी पाणी करार
 • पाकच्या पंजाब प्रांतासाठी सिंधूचं पाणी अतिशय महत्त्वाचं
करार मोडण्याचे फायदे
 • पाकला चांगलीच अद्दल घडेल
 • भारत पाण्याचंही अस्त्र उगारू शकतो याची पाकला जाणीव होईल
 • पाकच्या जनतेचा तिथल्या सरकारवर दबाव वाढेल
 • पाककडे पाण्याचं अस्त्र नाही
 • युद्ध लढण्यापेक्षा हा उपाय सोपा आणि स्वस्त

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates