21 February, 2019

भारताला जगभरातून पाठींबा





देशात पुलवामा हल्ल्यामुळे संतापाची लाट उठली आहे. सर्व स्तरावरून या हल्ल्याचा निषेध होत आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात यावे हीच मागणी होत आहे. पुलवामाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनंतर आता रशियानेही भारताला पाठिंबा दर्शवला आहे. भारताने हल्लेखोरांना भारताने प्रत्युत्तर द्यावे. आम्ही लागेल ती मदत करू असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे.

पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. भारत सरकारने आणि सर्व भारतीय नागरिकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यामुळे इतर मोठ्या राष्ट्रांनी भारताची बाजू घेतली आहे. नेहमी पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या रशियानेही भारताला पाठिंबा दिला आहे.

'काश्मीरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. पुलवामाच्या हल्लेखोरांना शिक्षा निश्चितच व्हायला हवी. दहशतवादविरोधी कार्यवाहीसाठी लागेल ती मदत रशिया करेल, हे मी ठामपणे सांगतो. भारताच्या दुखवट्यात रशिया सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो.' असं पुतिन यांनी म्हटलं आहे. बिनधास्त लढा, लागेल ती मतद करू असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला स्वसंरक्षणाचा हक्कच आहे अस म्हटलं आहे.   

सौदी अरेबियानंही भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. 'दहशतवाद हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही भारताला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत असं आश्वासन सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी  दिलं आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जगभरात शान आणि मान वाढला आहे.  

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates