१२ कोटी
शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यात २५,००० कोटी
रुपये देणार मोदी सरकार जमा करणार असून हे पैसे आजच जमा होत आहेत. किसान
सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. मोदी सरकारने रविवारी या
योजनेचा पहिला हफ्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचं ठरवलं होतं. गोरखपूर
राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकवर
देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा
करणार आहेत. यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही
एक आहे. या योजनेंवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार कोटी
रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी
रविवारी जारी करणार आहेत. ही रक्कम छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. भाजपाचे
खासदार आणि किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी ही योजना
शेतकऱ्यांसाठी लाभदायी असल्याचं सांगितलं आहे. ही योजना शेतकऱ्यांना लागू
करण्यासाठी तळागाळापर्यंत काम पूर्ण झालं आहे. यूपीतले भाजपा किसान मोर्चाचे
अध्यक्ष राजा वर्मा म्हणाले, शेतकऱ्यांसाठी
ही पहिली योजना आहे. जी देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून
आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment