मुंबई गोवा महामार्गाचं
काम वेगाने होत असून खोल दरीखोर्यातून जाणारी नागमोडी वळणे आणि डोंगरातून कोसळणार्या
दरडी असा नैसर्गिकदृष्टय़ा अत्यंत धोकादायक असलेला कशेडी घाटातला प्रवास आता सुखकर
आणि झटपट होणार आहे. वळण रस्त्याला पर्याय म्हणून कशेडी घाटातच दोन बोगदे तयार
करण्याच्या कामाने वेग घेतला असून त्याचे संकल्पचित्र बनवण्यात आले आहे.
संकल्पचित्रानुसार घाटाच्या आतून तीन पदरी असे हे दोन बोगदे तयार करण्यात येणार
असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर
कोकणात जाणार्या चाकरमान्यांना कशेडी घाट ओलांडायची कसरत करावी लागणार नसून ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार
आहे.
मुंबई-गोवा
राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असला
तरी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे शापित ठरला आहे.
घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने बोगदा खणून रस्ता करण्याचे काम हाती
घेण्यात येणार आहे. या घाटातील प्रस्तावित ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करून बनवण्यात येणार आहे. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा
मार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर या
दरम्यान हे दोन बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास
कार्यक्रमांतर्गत देशभरातील कामं पुर्ण होत असून मुंबई गोवा महामार्ग आधीच्या सरकारने
चुकीची कंत्राटं दिल्याने आणि जमीन संपादन लांबल्याने अजून पुर्णत्वाला गेला नाही.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी तडफदारपणे काम करून देशभरात वेगाने
रस्ते बांधणी केली आहे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment