16 February, 2019

पुरोगामी दहशतवाद





जून २०१५ मध्ये भारतीय सेनेने म्यानमारच्या सीमेत घुसून १५८ दहशतवाद्याना ठार मारलं होतं. त्या आधी दहशतवाद्यानी घडवून आणलेल्या घातपाती कारवायात भारतीय लष्कराचे अठरा जवान कामी आले होते. सीमेवरच्या राज्यात अशा प्रकारचे हल्ले करून शेजारच्या देशात आश्रय घ्यायचा ही दहशतवाद्याची नेहमीचीच चलाखी. असे हल्ले वर्षोंवर्ष होत असूनही राजकिय इच्छाशक्तीच्या अभावी त्याचा चोख बंदोवस्त होत नव्हता. राजकिय निर्णयाचा अभाव असल्याने सेनादलाचे हात बांधलेले असायचे. केंद्रीय सरकारमध्ये सत्तापालट झाल्यावर मोदी सरकारने ऍक्ट इस्ट’, ‘मेक इन इंडीयासारखी धोरणं आखून या प्रकारच्या कारावायांवर सर्वंकश नियंत्रण मिळवण्याचा तसंच समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दहशतवाद ही आता संपुर्ण जगाची समस्या असून त्याला कोणताही देश अपवाद नाही. या विरोधात उपाययोजना करायची असेल तर जागतीक नेत्यांचं एकमत होणं जरुरीचं आहे. गेल्या दोन वर्षात दिवसरात्र एक करून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जगभरातील अनेक देशाचे दौरे केले आणि भारताचे हितसंबंध जपण्यांचं आणि त्यात वाढ करण्याचं महत्वाचं काम केलं. दहशतवादाचा मुकाबला करणं हासुद्धा त्या रणनितीचा एक भाग होता. आसामसारख्या राज्यात त्यानंतरच सत्ता परिवर्तन झालं. केंद्र सरकारच्या कृतीला जनतेचा पाठिंबा मिळाला.

देशाच्या पूर्व सीमेवर अशा प्रकारची कारवायी होत होती तोपर्यंत त्यावर देशभरातून फार मोठी प्रतिक्रिया येत नव्हती पण पाकिस्तानच्या सीमेत घूसून सर्जिकल ऑपरेशनकरून  दहशतवादी आणि त्याच बरोबर पाक सैनिकांना कंठस्नान घतल्यावर मात्र पाकिस्तानचे इथले हस्तक किंवा पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेले लोक संभ्रम निर्माण व्हावा अशी वक्तव्य करायला लागले आहेत. आजपर्यंत भारतीय सेनेवर देशातून असा संशय व्यक्त केला गेला नव्हता. लष्कराने केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले गेले नव्हते मग आत्ताच ते का मागण्यात येत आहेत? पाकिस्तानचे भारतातले हे डीप असेट्सखाल्ल्या अन्नाला जागत आहे काय? की जनता मोदींना डोक्यावर घेऊन नाचेल म्हणून भयभित झाले आहेत? मोदींना विरोध करायचा म्हणून ही पुरोगामी मंडळी आता थेट पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवू लागली आहेत. या पैकी अनेकजण या पुर्वीच्या सरकाराचा भाग होते, कित्येकजण पत्रकार बनून अपप्रचार करीत आहेत, परकिय पैशावर पाळल्यागेलेल्या एनजीओचाही त्यात सक्रिय सहभाग दिसतो आहे.

ही मंडळी काय करतात तर भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्ला... इन्शाअल्ला...असे नारे देणार्‍याला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याची भलामण करतात. आम्हीपण सर्जिकल स्ट्राईक केले होते पण त्याचा गवगवा केला नाही असा तद्दन खोटा दावा करतात, औरंगजेबाला सुफी संताचा दर्जा द्यावा आणि त्याच्या विरोधातली सगळी विधानं पाठ्यपुस्तकामधून काढून टाकावित म्हणून उपोषणाला बसतात. (मग शंभूराज्याना कुणी मरलं? असा प्रश्न त्याना विचारायचा नसतो.) पाकिस्तानच्या टिव्ही वाहिन्यावरच्या चर्चेमध्ये भाग घेऊन मोदी सत्तेत असे पर्यंत भारत-पाक चर्चा होऊ शकणार नाही, त्यासाठी त्याना सत्ताभ्रष्ट करावं लागेल आणि पकिस्तानने या कामी आपल्याला मदत करावी म्हणून आर्जवं करतात. पाकिस्तानी कलाकारांचा कैवार घेऊन  दहशतवाद आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून बुद्धीभेद करतात. पाकिस्तानी सामान्य जनता आणि कलाकार किती महान आहेत याचे दाखले द्यायची अहमहमिका लागते. या कलाकारांच्या नांगीत किती विष भरलेलं असतं त्याची वानगीदाखल ही एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी दृष्टी साफ होईल. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेली हकिकत त्या पाकिस्तानी कलाकारांविषयी सगळं सांगून जाते. ती गोष्ट अशी:

जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. भारताशी प्रत्यक्ष युद्ध करून यश मिळवता येणार नाही याची पक्की खात्री असणार्‍या पाकिस्तानने वर्षानुवर्ष डावपेच आखून आपली माणसं भारतात पेरली आहेत. ते पाकिस्तानी हस्तक अतिशय मोक्याच्या जागा धरून बसलेत किंवा मोक्याच्या जागी बसलेल्यांनाच शत्रू त्याचे हस्तक म्हणून निवडत व नेमत आला आहे. त्यात बुद्धीजिवी, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार, अधिकारी,राजकारणी अशा विविध पेशातील मंडळींची निवड होत असते. त्यांनी आपली बुद्धी समाजाच्या बुद्धीभेदासाठी पणाला लावावी, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. हेच ते घरभेदी तत्कालिन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना दिर्घकाळ माध्यमातून लक्ष्य करीत होते. सिंग यांच्या कालावधीमध्ये काश्मिरात लष्कराने मोठे यश मिळवलेले होते आणि अनेक जिहादी दहशतवादी उचापती सोडून मुख्यप्रवाहात येण्य़ाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तिलाच शह देण्यासाठी लष्कर दिल्लीवर चाल करून येणार होतं अशा अफ़वा पिकवण्यात आल्या होत्या. दहशतवादाला वेसण घालणारी सिंग यांची मोहिम हाणून पाडण्यासाठीचे हे काहूर पद्धतशीरपणे माजवण्यात आलं होतं. देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफ़वा पाकिस्तानने फ़ैलावलेली नव्हती तर इथल्या माध्यमवीरांनी आणि पत्रकारांनी ती तिखटमिठ लाऊन जनतेसमोर आणली होती. आता तीच मंडळी भारताचे लष्करी कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घोषणा करतानाच पुरावे असल्याचे सांगितले असूनही त्यावर संशय व्यक्त करीत आहेत.

या घरभेद्यांच्या कारवायामुळेच पाकिस्तानची सीमेवर कुरापती काढण्याची हिम्मत होते. मग सीमेवरच काय मुंबईवरही हल्ले होतात. मुंबई हल्ल्याच्यावेळीही सर्जिकल ऑपरेशन करता आलं असतं पण तत्कालिन गृहमंत्री कपडे बदलण्यात व्यस्त आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आपल्या मुलाला सिनेमात प्रमोट करण्यासाठी अतिरेक्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल ताजची सफर सिनेदिग्ददर्शकाबरोबर करीत फिरत होते. या घटनांचं गांभिर्यच हरवलं होतं. परिणामी हेच पुरोगामी हस्तक घटनेच live फुटेज पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या बॉसना पुरवीत होते तरी त्यांच्यावर कोणतीही कारवायी झाली नाही. ही पकिस्तानी अतिरेक्यांना केलेली थेट मदत होती. अशा प्रकारे भारताला युद्ध परवडणारं नाही असं एका बाजूला सांगत दुसर्‍या बाजूने दहशतवाद्याना थेट मदत करण्याचं काम याच पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळीनी चालवलं आहे. या अशा गोष्टींमुळेच लष्कर आणि पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होत असतं. त्याना थारा कोण देत हा खरा प्रश्न आहे. शेवटी अख्खा देश म्हणजे फक्त सैन्य नव्हे, की तेच फक्त लढतील. राजकारणी, नोकरशहा, पत्रकार, कलाकार आणि सामन्य जनता असे सगळे मिळूनच तो देश बनतो. हाच न्याय पाकिस्तानलाही आहे, त्यांचे कलाकार हे त्या देशाचा भाग आहे आणि पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असेल तर ते कलाकारही त्या शत्रूचाच भाग आहेत. ते दहशतवाद्यांचे हस्तक असू शकतात. त्याना दिवाणखान्यात आश्रय का द्यायचा? ते कलाकार तरी वेगळे करता येतात पण त्यांचे भारतातले साथीदार ओळखणं गरजेचं आहे.

खरा धोका किंवा जास्त धोका कुणापासून? पाकिस्तानकडून की चीनकडून असाही एक प्रश्न निर्माण करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. तो धोका दोन्ही बाजूने आहे आणि आता तर हे दोन्ही शत्रू एक झाले आहेत. बलुचीस्तान या आपल्याच पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या प्रांतात तिथल्या जनतेला चिरडून हे चालू आहे. तो भाग पाकिस्तानने चीनला आंदण दिला आहे. सीमेवर सैनिक लढतच आहेत, त्याना आपण घरात बसून मदत करू शकतो, कशी तर चीनी मालावर बहिष्कार घालून, ‘मेक इन इंडीयाला साथ देऊन आणि पाकिस्तानच्या इथल्या पुरोगामी दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखऊन, निवडणूकात चारीमुंड्या चीत करून आपण आपल्यातला देशाभिमान जागृत असल्याचा पुरावा देवू शकतो. सर्जिकल ऑपरेशनच्या पुराव्यापेक्षा या पुराव्याची जास्त जरुरी आहे आणि हाच पुरावा या मंडळींचा बुरखा फाडून टाकेल.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
           


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates