जम्मू काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेते आणि १५५ राजकीय नेत्यांची सुरक्षा जम्मू-काश्मीर सरकारने काढण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. याआधी केंद्र सरकारने हुर्रियत परिषदेच्या सहा नेत्यांची सुरक्षा काढली होती. यात मीरवाईज फारूखचाही समावेश होता. फुटीरतावादी नेत्यांना सरकारी खर्चाने सुरक्षा देणे हा राज्याचा साधनसंपत्तीचा अपव्यय होता, पणा गेली कित्येक वर्षं त्याना हा फुकटा फौजफाटा देण्यात आला होता. एसएसएस गिलानी, आगा सैद मोस्वी, मौलाना अब्बास अन्सारी, यासिन मलिक, सलीम गिलानी, शाहीद उल इस्लाम, झफर अकबर भट, नईम अहमद खान, मुख्तार अहमद वझा, फारूख अहमद किचलू, मसरूर अब्बास अन्सारी, आगा सैद अबुल हुसेन, अब्दुल गनी शाह आणि महंमद मुसादिक भट या फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षेची गरज नसलेल्या १५५ राजकीय नेत्यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यात सरकारी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या शाह फैजल यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी सुमारे एक हजार पोलिस आणि १०० वाहने वापरली जात होती.
भारताचं खाऊन
पाकिस्तानचं गाणारे हे फुटीर सरकारी खर्चावर आजपर्यंत डल्ला मारत होते. या फुटीर वाद्यांच्या
घरांची आता झडती घेण्यात आली. त्यात पाकिस्तानशी जोडलेली फोनची हॉट लाईन आणि इतर इलेट्रॉनीक
साधनांचा सर्रास वापर केला जात होता याचा खुलासा झाला असून आता ती सर्व सामुग्री जप्त
करण्यात आली आहे. अशा लोकांना सवलत देऊन हळूहळू आणखी एका पाकिस्तानची निर्मिती भारतातल्या
पाकसमर्थकांनी केली आहे. असे हे समर्थक देशभर पसरले असून भारतातल्या अनेक संस्था, राजकिय
पक्ष, स्वयंसेवी संघटना, नक्षल प्रभावीत क्षेत्रं, सरकारी नोकरी, विद्यापीठं
अशा अनेक ठिकाणी त्यानी आपलं बस्तान बांधलं आहे.
मोदी सरकार
सत्तेवर आल्यापासून त्या सरकारने ही घाण साफ करायला
घेतली असली तरी त्यांची मुळं खोलवर रुतली आहेत. अनेक ठिकाणी राजरोसपणे हे उद्योग
सुरू असून राजकिय पक्ष आणि व्यक्तींचा त्याला पाठींबा आहे. हे लोकच पाकिस्तानची खरी
ताकद आहेत, इथल्या Assets आहेत.
श्रीनगरमधल्या
घरभेद्यांची सुरक्षा काढली ही या साफसफाईची एक सुरूवात आहे. अजून बरंच काम बाकी
आहे.
No comments:
Post a Comment