ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ही ५७ इस्लामी इस्लामबहुल देशांची संघटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खालोखाल तिचे महत्त्व आहे, ते तिच्या आकारामुळे. चार खंडांतील तब्बल ५७ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याआधी ती इस्लामी देशांची परिषद या नावाने ओळखली जात असे. जगभरातील तमाम इस्लामधर्मीयांच्या हिताचे रक्षण हे तिचे उद्दिष्ट. तथापि प्रत्यक्षात ती या धर्मीयांच्या दबावगटासारखे कार्य करते. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक इस्लामधर्मीय देशांना तिच्याकडून भरभक्कम आर्थिक मदत वा रसद पुरवली जाते.

या परीषदेत “दहशतवाद हा अनेकांचे प्राण
घेताना विविध प्रदेशांत अस्थिरता निर्माण करीत असून, त्यामुळे तो जगाला मोठा धोका आहे”, असे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष पाहुण्या म्हणून बोलताना सांगितले.
इस्लाम म्हणजे शांतता व अल्लाच्या ९९
नावांमध्ये हिंसाचाराला कुठेही थारा नाही. तसेच जगातील प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा व बंधुत्वाचा
पुरस्कार करणारा असून ज्ञान, शांतता, श्रद्धा व परंपरा
यांचा पुरस्कार करणाऱ्या देशाची मी प्रतिनिधी असून, वेगवेगळे पोशाख, चवी, सांस्कृतिक व भाषिक वारसा अनेक पिढय़ा आम्ही जपला आहे. भारतातील लोकांनी
विविध श्रद्धा व एकमेकांशी सुसंवादावर नेहमीच विश्वास ठेवला असे सुषमा स्वराज या
बैठकीत म्हणाल्या.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ही ५७
इस्लामी इस्लामबहुल देशांची संघटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खालोखाल तिचे
महत्त्व आहे, ते तिच्या
आकारामुळे. चार खंडांतील तब्बल ५७ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याआधी ती इस्लामी
देशांची परिषद या नावाने ओळखली जात असे. जगभरातील तमाम इस्लामधर्मीयांच्या हिताचे
रक्षण हे तिचे उद्दिष्ट. तथापि प्रत्यक्षात ती या धर्मीयांच्या दबावगटासारखे कार्य
करते. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक इस्लामधर्मीय देशांना तिच्याकडून
भरभक्कम आर्थिक मदत वा रसद पुरवली जाते.
अबुधाबीत झालेल्या आयओसीच्या बैठकीत 'सन्माननीय पाहुणे' म्हणून प्रथमच
भारताला निमंत्रित करण्यात आलं. आबुधाबीतील इस्लामिक कोऑपरेशनच्या बैठकीला सुषमा
स्वराज दाखल झाल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे. कारण पाकिस्तानचे
परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या बैठकीला धमकी दिली होती, की स्वराज या
बैठकीला उपस्थित राहणार असतील तर पाकिस्तान बैठकीवर बहिष्कार टाकेल. मात्र
त्यांच्या या धमकीला कोणी विचारले ही नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच नाचक्की झाली
आहे. वस्तूत: या संघटनेची स्थापना पाकिस्तानच्या पुढाकाराने केली गेली होती आणि त्यासाठी
पाकिस्तानने पैसा ही ओतला होता. आता ओआयसी या पाकच्या घरातूनच त्यानाबाहेरचा रस्ता
दाखवण्यात आला आहे. १९६९ मध्ये मात्र पाकिस्तानच्या
सांगण्यावरून मोरोक्को परिषदेचे भारताचे निमंत्रण रद्द झाले होते.
या परीषदेत “दहशतवाद हा अनेकांचे प्राण
घेताना विविध प्रदेशांत अस्थिरता निर्माण करीत असून, त्यामुळे तो जगाला मोठा धोका आहे”, असे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विशेष पाहुण्या म्हणून बोलताना सांगितले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या
पाश्र्वभूमीवर त्यांनी सांगितले, की दहशतवाद व अतिरेकवाद
ही नावे वेगळी असली तरी या ना त्या कारणाने त्यातून
प्राणहानी होत आहे. धर्माच्या विकृतिकरणातून या दहशतवादाचा जन्म झाला असून, दहशतवादाचा मार्ग
यशस्वी होतो असा गैरसमज झाला आहे. त्यातून त्याचा प्रसार होत आहे. सतरा
मिनिटांच्या भाषणात स्वराज यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. त्या म्हणाल्या, की आमचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी व १३० कोटी भारतीय तसेच १८५ दशलक्ष मुस्लीम बंधूभगिनी यांच्या
शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आमचे मुस्लीम बंधूभगिनी हे देशाच्या विविधतेचे
प्रतीक आहेत.
इस्लाम म्हणजे शांतता व अल्लाच्या ९९
नावांमध्ये हिंसाचाराला कुठेही थारा नाही. तसेच जगातील प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा व बंधुत्वाचा
पुरस्कार करणारा असून ज्ञान, शांतता, श्रद्धा व परंपरा
यांचा पुरस्कार करणाऱ्या देशाची मी प्रतिनिधी असून, वेगवेगळे पोशाख, चवी, सांस्कृतिक व भाषिक वारसा अनेक पिढय़ा आम्ही जपला आहे. भारतातील लोकांनी
विविध श्रद्धा व एकमेकांशी सुसंवादावर नेहमीच विश्वास ठेवला असे सुषमा स्वराज या
बैठकीत म्हणाल्या.
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या फक्त इस्लामबहुल देशांच्या वार्षिक अधिवेशनासाठी भारताला तब्बल पाच दशकांनी निमंत्रण दिले गेले हे नरेंद्र मोदी सरकारचे मोठेच धोरणयश. पाकिस्तानने ओआयसी संघटनेला पत्र पाठवून सुषमा स्वराज यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची विनंती केली होती ती फेटाळण्यात आली. भारत सरकारच्या परराष्ट्र नितीचं हे मोठं यश आहे.
आजपर्यंत पाकिस्तान आपल्यावर हल्ला झाल्यास आपल्यामागे ओआयसी आहे असा बागुलबूवा नेहमी दाखवायचा त्या आघाडीवरही पाक आता पुरता उघडा पडला आहे.
No comments:
Post a Comment