परवा गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या मा. मनोहर पर्रीकरांचं निधन झालं आणि एक कामसू राजकर्ता आपल्यातून निघून गेला. मनोहर पर्रीकरांच्या दु:खद निधनानंतर ते किती साधे होते याचं माध्यमातून खुप कौतूक झालं आणि सुरू आहे. मनोहर पर्रीकर वरिष्ठ पदांवर असूनही नक्कीच कमालीचे साधे होते, पण, तो त्यांचा वाखाणण्यासारखा एकमेव गुण नव्हता. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढून सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लावण्यातही त्यांचा हातखंडा होता. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं पूर्ण बहूमत असलेलं सरकार आलं तरी पूर्णवेळ संरक्षण मंत्र्याची जागा रिकामी होती. मनोहर पर्रीकर दिल्लीला यायला राजी होईपर्यंत पंतप्रधानानी ती रिकामी ठेवली आणि मनोहर पर्रीकर दिल्लीला आले ते संरक्षणमंत्री पदाची शपथ घ्यायलाच.
मनोहर पर्रीकरांसारखाच माणूस नरेंद्र मोदींना
का पाहिजे होता? कारण तोपर्यंत हे खातं
म्हणजे गुप्ततेच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं कुरण बनलं होतं. युद्ध झाल्यास पंधरा दिवसही
पुरणार नाही एवढीच सामग्री लष्कराजवळ होती. लष्कराचं गुप्तहेर खातं पार पांगळं बनवण्यात
आलं होतं. हिंदू दहशतवादाच्या
नावाखाली कर्नल पुरोहीतांसारख्यांना अटक करून त्यांचा अतोनात छळ करण्यात येत होता.
संरक्षण दळांचं मनोधैर्य रसातळाला गेलेलं होतं. या सर्वावर त्वरीत उपाय योजण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशासाठी एका सक्षम संरक्षण मंत्राची जरुरी होती आणि मनोहर
पर्रीकरांच्या रुपात तो त्याना दिसत होता. पर्रीकरांनी दिल्लीला यायचं मान्यकेल्यावर
लगेच त्यांचा शपथविधी झाला आणि त्यांनी वेगाने कार्याला सुरूवात केली, निर्णय घेतले.
सेना दलाच्या हाती केवळ शस्त्रे असून भागत
नाही तर त्यामागे अतुल मनोधैर्य असलेला सैनिक असावा लागतो, शत्रूची अचूक माहिती
लागते आणि सक्षम राजकिय नेतृत्व लागतं. मनोहर पर्रीकरांच्या रुपाने असा संरक्षण मंत्री
देशाला लाभला तेव्हाच उरीचा बदला घेणारा सर्जीकल स्ट्रायीक
शक्य झाला आणि पुलवामा कांड
झाल्याबरोबर एअर स्ट्रायीकने
पाकिस्तानला आपण त्यांची जागा दाखऊन देवू शकलो. शत्रूची नेमकी माहिती मिळवण्यात यश
आलं तेव्हाचं हे काम शक्य झालं. मनोहर पर्रीकरांनी अल्पावधीत हे
काम करून दाखवलं हे त्याचं देशाप्रती केलेलं असामान्य कर्तुत्व होतं.
दलाली खाण्यासाठी कमाईचे सुरक्षित खातं ते
सर्जीकल स्ट्रायीक करणारं सक्षम खातं असा या खात्याचा कायापालट मनोहर पर्रीकरांनी केला, देश त्यांचा सदैव रुणी
राहील. याच माणसाच्या कामगिरी व धोरणांमुळे बालाकोट शक्य झालं. मृतवत झालेलं हेरांचं
जागतिक जाळं नव्याने विणावं लागेल असं पर्रीकर म्हणाले होते, त्यानी ते करून दाखवलं.
त्यानी सैन्याच्या
साहित्यविषयक गरजांचा विचार केला, निर्णय घेतलेच, पण सुरक्षा
व्यवस्थेत परदेशातील आपले हस्तक व हेरांचा नेमका विचार करून ते भक्कम केलं. संरक्षण
मंत्री झाल्यावरही रिक्षाने फिरण्याचा साधेपणा त्यांच्या अंगी होताच, पण त्या साधेपणाबरोबरच
असामान्य कर्तुत्वाची जोड असणारा कणखर संरक्षण मंत्री आणि राज्यकर्ता त्यांच्या ठायी
वास करीत होता. त्या योध्याला शतश: नमन. ॥जय हिंद॥
No comments:
Post a Comment