12 March, 2019

चाबहार बंदराने दिला पाकला झटका



भारताने कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणुक केलेल्या इराणमधल्या चाबहार बंदरामुळे भारत, इराण आणि अफगाणिस्तानच्या व्यापारात प्रचंड वाढ होणार आहे. या बंदराला इराणच्या रेल्वे आणि रस्त्यांच्या जाळ्याने अफगाणिस्तान तसच मध्य आशियातील देशांना जोडण्यात य़ेईल. यामार्गे अफगाणिस्तानला मालवाहतूक सुरूही झाली आहे. त्याबरोबरच पाकिस्तान आणि चीनची लष्करी कोंडी केली गेली आहे. यामुळेच चाबहार बंदराला या भागातील गेम चेंजर म्हटल जातंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात हा भारताचा दिर्घकालीन मास्टर स्ट्रोकच आहे.

चाबहार बंदर हे इराणच्या दक्षिणेला ओमानच्या आखातात आहे. बंदर जरी इराणमध्ये असलं तरी त्याच्या बांधणीत भारताची भूमिका महत्वाची आहे. भारताने कोट्यवधी डॉलर्सची नुसती गुंतवणुकच केलेली नाही तर तंत्रज्ञानाच्या पातळीवरसुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे.
चीन पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रचंड गुंतवणुक करत असून रस्ते आणि बंदराची उभारणी चालू आहे. त्याचाच भाग म्हणून बलुचिस्तानमध्ये ग्वादर बंदर बांधण्यात आलं आहे. व्यापारी आणि लष्करी दृष्टीकोनातून त्याचं महत्व खूप आहे. चीन स्वत:च्या व्यापाराबरोबरच त्याचा वापर आण्विक पाणबुड्यांचा तळ म्हणूनही करत आहे. त्याबरोबरच मध्य आशियातल्या देशांशी असलेल्या व्यापारातसुद्धा ग्वादर बंदराचं महत्व फार आहे. त्यामुळेच ते भारतासाठी मोठं आव्हान आणि धोका आहे.


चाबहार हे बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून ८५ किमी अंतरावर ओमानच्या आखातात आहे. या बंदरामुळे अफगाणिस्तानसकट सर्व मध्य आशियातल्या देशांसाठी सोयीचा आणि जवळचा मार्ग निर्माण झाला आहे. चाबहार बंदरामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांना व्यापारासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे आपोआपच ग्वादर बंदर आणि पर्यायाने पाकिस्तानचंसुद्धा महत्व कमी झालं आहे. सामरीक दृष्ट्याही याचं फार मोठं महत्व आहे.  

चाबहार बंदरामुळे भारत पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तानला जहाजांव्दारे माल वाहतूक करू शकत आहे. भारताच्या आग्रहाखातर अमेरिकेने या बंदरावरची ईराणवर घातलेली बंदी  उठवली आहे.  
चाबहार बंदराचे भारताला पुढील ७ फायदे आहेत.

१. चाबहार बंदरराचा फायदा भारतातल्या व्यापार्‍यांना होणार आहे. भारतीय व्यापारी आपला माल सरळ ईराणला पाठवू शकणार आहेत. तिथून ते पुढे  अफगाणिस्तान आणि  मध्य एशियामध्यल्या अनेक देशात पाठवता येईल.   आजपर्यंत या देशात जायला पाकची आडकाठी होत होती.

२. चाबहार बंदर सुरू झाल्याने भारताच्या निर्यात खर्चात मोठी कपात झाली आहे. (१/३ एवढी कपात झाली आहे.)  

३. पाकिस्तान आणि चीन बरोबरच्या कटू संबंधामुळे भारत इतर एशियायी देशांशी मजबूत  नातं निर्माण करू इच्छितो, ईराण आणि अफगाणिस्तानशी व्यापार वाढल्याने स्वभाविकपणे या  देशांशी भारताची मैत्री वाढून संबंध पक्के होणार आहेत.

४. ओमानच्या खाड़ीत चाबहार बंदरामुळे आपली क्षमता तीप्पट वाढली आहे. पाकच्या ग्वादर बंदराला हे आव्हान आहे.

५. ३४ करोड़ डॉलरच्या या प्रकल्पात खातम अल-अनबिया (Khatam al-Anbia) या ईराणच्या सर्वात मोठ्या कॉन्ट्रॅक्टर कंपनी बरोबर  भारतीय कंपन्यांनीही भाग घेतला आहे.

६. चाबहार बंदराने ईराणला हिन्द महासागरच्याजवळ आणलं आहे.

७. गेल्या वर्षात भारताने चाबहार पोर्ट आणि त्याच्याशी संबंधीत रस्ते आणि रेल्वे मार्ग विकाससाठी ५० कोटी डॉलर दिले आहेत.



4 comments:

  1. A timed water pump attracts the stable-laden fluid from the cyclone backside at intervals.

    ReplyDelete
  2. With a little Search Engine Optimization knowledge under
    your belt, you can be on your method to improving your brand name's internet
    search engine ranking in no time at all.

    ReplyDelete
  3. Hi there it's me, I am also visiting this site on a regular basis, this website is actually fastidious and the
    visitors are actually sharing pleasant thoughts.

    ReplyDelete
  4. Your mode of explaining all in this post is in fact nice,
    all be capable of effortlessly understand it,
    Thanks a lot.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates