16 March, 2019

अनंतनागमध्ये २८ वर्षांनी उघडलं थिएटर

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचंड तणावाखाली असलेल्या काश्मिरी नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. सर्वाधिक दहशतग्रस्त व संवेदनशील जिल्हा अशी ओळख असलेल्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर एक चित्रपटगृह खुलं झालं आहे. 'हेवन' नावाच्या या चित्रपटगृहाच्या रूपानं जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना जणू स्वर्गाची दारेच खुली झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात, ६ मार्च रोजी हे थियटर खुले झाले. थिएटर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' आणि जे. पी. दत्ता दिग्दर्शित 'पलटन' चित्रपट दाखवला गेला. सीआरपीएफच्या जवानांनी या चित्रपटांचा आनंद लुटला. एका स्थानिक व्यावसायिकाच्या इमारतीत १९८९ साली 'हेवन' चित्रपटगृह सुरू झालं होतं. ते सुरू झाल्यानंतर इथं ग्रेनेड हल्लाही झाला होता. चित्रपट बघणं इस्लामच्या विरोधात आहे असं म्हणत 'अल्लाह टायगर' नावाच्या संघटनेनं चित्रपटगृह बंद करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हे चित्रपटगृह बंद करण्यात आलं होतं.

'हेवन' चित्रपटगृहाची आसनक्षमता ५२५ आहे. १९९१ साली या चित्रपटगृहात अमिताभचा 'कालिया' हा शेवटचा चित्रपट दाखवला गेला होता. त्यानंतर गेली २८ वर्षे कुठलाही चित्रपट इथं झळकला नाही. सीआरपीएफच्या जवानांनी स्वत: पुढाकार घेऊन हे चित्रपटगृह पुन्हा सुरू केलं आहे. 'अनंतनागमध्ये थिएटर सुरू होणं हा एक भावनिक क्षण आहे,' असं सीआरपीएफच्या एका जवानानं सांगितलं. 'काश्मीरमधील अनेक तरुणांनी अद्याप चित्रपटगृह पाहिले देखील नाही. लवकरच सर्वसामान्य काश्मिरी नागरिकांना इथं चित्रपट पाहायला मिळेल,' असं या जवानानं सांगितलं.

श्रीनगरमध्ये काय चाललंय आणि काय होऊ घातलंय त्याची ही झलक म्हणता येईल. 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 
Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates