21 March, 2019

रंग सोहळा


प्रिय मित्र आत्माराम परब यांनी Plitvice National Park, Croatia येथे
टिपलेलं हे छायाचित्र पाहून सुचलेली कविता.


रंग सोहळा हा सृष्टीचा
खेळत आहे कान्हा रे
नवरंगांनी न्हाली धरती
पदर तीचा हा ओला रे

ती खेळत आहे राधा तिकडे
गोपी आल्या आल्या रे
पिचकारी कृष्णाची मागून
सचैल होऊन गेल्या रे

कात टाकली वसुंधरेने
रंग बहरले आता रे
निळा, जांभळा, लाल, केशरी
वरून दुधाच्या धारा रे

अपुर्व आहे रंगोत्सव हा
रंग उसळले सारे रे
वाहत आहे आसमंत हा
तना-मनातून सारा रे

नरेंद्र प्रभू
२१/०३/२०१९

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates