सध्या अनेक बँकांकडून व
खासगी फायनान्स कंपन्यांकडून अनेक कारणांसाठी कर्जे घेतली जातात. परंतु ती
कर्जदारांकडून वेळेत परतफेड केली जात नाहीत त्यामुळे बँकांना व अन्य कर्ज देणाऱया
कंपन्यांना मोठी तडजोड करावी लागते. तर सध्या देशातील सरकारी कार्यक्षेत्रात
कार्यरत असणारी सर्वात मोठी बँक म्हणून भारतीय स्टेट बँपेला (एसबीआय) ओळखले जाते.
याच बँकेकडून चालू महिन्यात कर्ज बुडव्याची ६ हजार १६९
कोटी रुपयाच्या संपत्तीचा लिलाव करणार असल्याची घोषणा केली आहे. कर्जदाराची
सध्याची संपत्ती आणि त्यांची होणारी किंमत यांच्यावर अंतिम बोली लावण्यात येणार
असल्याचे म्हटले आहे.
एसबीआय आजपासून ३० मार्चपर्यंत पूर्व योजनेचा आराखडा तयार
करणार आहे. त्यातून संबंधीत कर्ज बुडव्यांची संपत्ती विक्रीस काढणार असल्याचे
सांगण्यात आले.
आजपर्यंत अशा कर्ज बुडव्यांना
राजकिय आश्रय मिळत होता, आता ते
दार बंद झालं आहे. कर्ज घेतल्यास ते सव्याज फेडावंच लागेल.
No comments:
Post a Comment