पाकिस्तानच्या F-16 फायटर विमानाला पाडून मिग-२१
भारतीय विमानाचा पायलट विंगकमांडर अभिनंदन परतत असताना त्यांचं विमान पाकव्याप्त काशमीरमध्ये
क्षतीग्रस्त झालं. मोक्याच्या क्षणी सर्वोच्य कामगिरी बजाऊन हा जाबाज सैनिक पॅर्याशूटमधून
उतरला तो पाकव्याप्त काशमीरमधल्या एका गावात. जखमी असूनही तिथल्या परिस्थितीचा आंदाज
आल्याआल्या भारताचा जयजयकार करतानाच त्याने आपल्या जवळच्या महत्वपूर्ण कागपत्रांचा
चोळामोळा करून तो गिळून टाकला आणि इतर कागद्पत्रं फाडून जवळच्या तलावात बुडऊन टाकली.
भाराताच्या दिशेने धावत येत असताना ५०० मिटरवर पाक सैनिकानी त्याला ताब्यात घेतलं.
पाकच्या ताब्यात असतानाही त्याचा रुबाब पहाण्यासारखा होता.
मिग-२१ ही विमानं नेहरुंच्या काळात खरेदीकरण्यात
आली होती आणि पाकची F-16 फायटर विमानं ही अमेरिकना बनावटीची अत्याधुनिक क्षेपणास्त्रधारी
विमानं आहेत. मिग-२१ ने F-16 फायटर पाडणं हा फार मोठा
पराक्रम आहे. तो या पठ्ठ्याने केलाच. पण पाकच्या ताब्यात गेल्यावरही असामान्य धैर्य
दाखवलं. प्रत्यक्ष कारवायी आणि मनोवैज्ञानिक दबाव यात तो जराही कमी पडला नाही.
इकडे मोदी सरकारने आपलं कौशल्य पणाला लाऊन २४
तासांच्या आत अभिनंदनला भारतात परत
पाठवण्याची घोषणा इमरान खानला पाकिस्तानच्या संसदेत करायला भाग पाडलं. अभिनंदन आज भारतात
परत येत आहे. मला वाटतं यालाच ’नया भारत’ म्हटलं जातं. जो आता पाकड्यांसमोर
झुकणारा नाही. भारत LOC पार करणार नाही या भ्रमात आता कुणी
राहू नये.
यात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे साठ वर्षं सत्ता गाजवणार्यांनी जुनाट
मिग-२१ विमानं वायुसेनेला
वापरायला भाग पाडलं आणि राफेलचा घोळ घालून ती योग्य वेळी विकत तर घेतली नाहीतच पण मोदी
सरकार राफेलचा
करार करून ती भारतात आणत असताना खोटे नाटे आरोप करून, न्यायालयीन विलंबाचा खेळ
खेळून वायु सेनेला दुर्बळ बनवण्याच्या जाणून बुजून प्रयत्न चालवलेला आहे. अशी माणसं
जैश-ए-मुहंमद पेक्षा जास्त खतरनाक आहेत. अस्तनीतले निखारे
आहेत.
कधी शांततेचा बुरखा धारण करणारे, कधी पुरस्कार वापसी
करणारे, कधी पुरोगामित्वाची
बोबं ठोकणारे, तर कधी मानवतेच्या नावाखाली लपून कारवाया करणारे असे लोकच
आपल्यातच राहून आपली प्रचंड हानी करणारे आहेत. यांचा बुरखाही टराटरा फाडण्याची हीच
वेळ आहे.
भिम पराक्रम करून शत्रूच्या पंजातून परत येणार्या
‘अभिनंदन’चं अभिनंदन...! त्याच
बरोबर कुटनितीक कारवायीतही पाकला नमवणार्या मोदी सरकारचंही अभिनंदन...!
No comments:
Post a Comment