तो... सुगंध
तसाच
नित्य दरवळणारा
तू अवती भवती
असताना
मला मोहवणारा
वार्याची झुळूक
नित्य नवी
तुझ्या अत्तराची
कुपी त्या संगे
हवीच हवी
मला अजून त्याची
सवय झाली नाही !
मंद सुवासाची
लहर
जुनी झालीच नाही
!
कोटी कोटी श्वास
सुखावत गेले
जगण्याची धुंदी
वाढवत गेले
तुझ्या
पाकळ्यांच्या आत
अशी काय जादू ?
किती किती पदर
त्याची लय कशी
साधू ?
हे तुझं चिरंतन
देणं
आणि माझं नित्य
नवं होणं
वसंता सारखं
बहरणं
आणि रातराणी
होणं
तो स्त्रोत तसाच
ठेव
नित्य दरवळणारा
माझ्या अवती
भवती
मला खुलवणारा
नरेंद्र प्रभू
khup chan sir...mastach..
ReplyDeleteManisha Jangam
va kya baat hai sir
ReplyDeleteAtul Dhayade
Va Khup Sunder Haluvar Bhavna Vyakta kelya aahet.!
ReplyDeleteSudheer Dharmadhikari
Prabhuda.........gaandh dhund mamohak rachana !!!!! khup bhavali !!!
ReplyDeleteSujata Shashank Phadke
मन धुंद करणारा "गंध धुंद".....प्रत्येक पुरुषाच्या मनात वावरणा-या सखीच्या अवती भवती दरवळणारा "गंद धुंद" मनाला भावला...कविता खूपच छान आहे.
ReplyDeleteअवचीतपणे आलेली कविता आपणा सर्वांना आवडली... धन्यवाद.
ReplyDelete