९०० पेक्षा जास्त कलाकार आणि लेखकांनी एकत्र
येऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘नेशन फर्स्ट’ या मंचाखाली एकत्र येऊन या कलाकार व
लेखकांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी मजबूर नाही तर मजबूत
सरकार पाहिजे असे या पत्रकात म्हटले आहे. यात पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, मालिनी अवस्थी, विवेक ओबेरॉय, कोयना मित्रा, गायिका अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, रिता गांगुली यांच्यासह ९०७ कलाकारांचा
समावेश आहे.
या कलाकारांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात
झालेल्या विकासकामांचेही
कौतूक केले आहे. काही दिवसांपूर्वी सहाशेहून अधिक कलाकारांनी भाजप आणि
मित्रपक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात अमोल पालेकर, नसिरहुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आदी कलाकारांचा
सामावेश होता. भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे
सांगत व्यक्ती
स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अनेक दिग्गज
कलाकार भाजप व पंतप्रधान मोदींच्या समर्थानात उतरले होते. याच धर्तीवर ९०७ कलाकार ‘नेशन फर्स्ट’ या मंचाखाली एकत्र येऊन भाजप आणि
मोदींची देशाला आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
मोदी सरकार चांगले काम करत असून मागील पाच
वर्षात देशाची
प्रतिष्ठा वाढली आहे. दहशतवाद या समस्येविरोधात उभे राहणारे पंतप्रधान नरेंद्र
मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. गेल्या
पाच वर्षात देशाने भ्रष्टाचारमुक्त, सुशासन, देशाला विकासाच्या मार्गावर नेणारे सरकार पाहीले आहे, त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल आणि
दहशतवादाला
हद्दपार करायचं असेल तर सध्याच्या घडीला कमकुवत नाही तर मजबूत सरकारची
आवश्यकता आहे. याचमुळे जनतेने कोणत्याही दबावात न येता मतदान करण्याचे आवाहन या
कलाकारांनी केले आहे.
No comments:
Post a Comment