24 January, 2019

बोगीबिलचं राष्ट्रार्पणकाही दिवसांपुर्वी ब्रह्मपुत्र नदीवरच्या देशातील सर्वात लांब डबल डेकर रेल्वे आणि रस्ते पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आसाममधील दिब्रुगढजवळील बोगिबिल येथे ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला हा पूल सुमारे ४.९४ किमी लांब आहे.

सुरक्षा धोरणांच्या दृष्टिकोनातून हा पूल खूप महत्वाचा मानला जातो. प्रचंड लष्करी टॅंकर  या पुलावरून सहज पार होऊ शकतात.

१९६२ च्या युद्धानंतर या पुलाची मागणी केली गेली होती. तसंच १९८५च्या  आसाम कराराच्या हा पुला हा एक भाग होता. मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर येताच त्यानी या पुलाच्या बांधणीत लक्ष घातलं आणि कित्येक दशकं रेंगाळणारं हे काम अत्यंत वेगाने पुर्ण करीत तो वाहतूकीसाठी खुलाही केला.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.

या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानचा प्रवास चार तासांनी कमी होईल. आणि तो 3 तासांत पूर्ण करता येईल.

सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या पुलाची अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात पोहोचण्यासाठी भारतीय सैन्याला मदत होईल.No comments:

Post a comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates