आमच्या सान्वीने तेराचा पाढा पाठ केला हे ऐकलं आणि
ही कविता सुचली
तेराचा पाढा
किती ग वेडा
म्हणता येतो का
धडा-धडा?
तेरा एके तेरा
तेरा दुना सव्वीस
एवढंच पाठ केलं
वेळा बावीस!
तेरा त्रिक एकोणचाळीस
तेरा चोक बावन
वाचून काढलं
अंकलिपीत पाहून
तेरा पाची पासष्ठ
तेरा सक अठ्ठ्याहत्तर
येतं एका झटक्यात
तो मात्र बहाद्दर
तेरा सप्ते
एक्याण्णव
तेरा आठे एकशे चार
पाठ व्हायला
वेळ लागतो फार
तेरा नवे एकशे सतरा
इथे मात्र वाटतो खतरा
तेरांधाय एकशे तीस
जीव झाला कासावीस
नरेंद्र प्रभू
२८/०४/२०१९
No comments:
Post a Comment