27 February, 2019

माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले





पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दीवसात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर (पाक व्याप्त काश्मीर नव्हे)  बालाकोट या ठिकाणी हवाई हल्ला करून जैश-ए-महंमदचं महत्वपूर्ण ठिकाण नष्ट केलं. या हवाई हल्ल्याबद्दल सर्व प्रथम भारतीय हवाई दलाचं आणि हा हल्ला करण्यास आदेश देण्यार्‍या निर्भीड नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन. जराही नुकसान न होता ही कारवायी तडीस नेण्यात आली म्हणून जवानांचं कौतूकच, पण त्याना आदेश देणारं सरकार देशात आहे हे प्रत्येक भारतीयाचं नशीब. २६/११ चा हल्ला झाला  तेव्हाही आपल्या सुरक्षा दलांना अशीच आरपारची कारवायी करायची होती, पण नेहमी भारत काहीतरी कृती करेल असं वाटलं की नमतं घेणार्‍या पाकला साथ देणारं सरकार तेव्हा अधिकारावर होतं. पाकचे हस्तकच सरकारमध्ये बसल्याने आणि सुरक्षा सौद्यामधल्या दलालीतच स्वारस्य असलेल्या घराण्यामुळे तेव्हा कारवायी होऊ शकली नाही.  त्या वेळीही आपल्याजवळ मिराज २००० ही फायटर विमानं होती आणि धैर्यशील वायूसेनाही होती, पण शिस्त पाळणार्‍या आपल्या लष्कराला तेव्हा पांगळं कसं करता येईल याचंच जणू काम ते सरकार करीत राहीलं. आज राफेल-राफेल म्हणून बोंब ठोकणार्‍या बुद्धूला तेव्हा दहा वर्षात कुणी अडवलं असेल तर या कमिशनने. देशाच्या सुरक्षेची अक्षम्य हेळसांड करणारे हेच खरे गुन्हेगार आहेत.     

जय हिंद’, वंदे मातरम्’, भारतमाता की जय म्हणायला लाजा वाटणार्‍या आणि त्याला विरोध करणार्‍या नादान शक्ती आणि जातीयवादाचं विष शिगोशीग भरलेल्या, तसंच तेच एक भांडवल करून आजन्म उर बडवणार्‍यांना आपल्या शुल्लक स्वार्थापुढे देशप्रेम कुठलं? मग हेच हलकट तुकडे-तुकडे गॅंगला समर्थन द्यायला त्यांच्या दारात रांगा लावयला, त्याना डोक्यावर घेऊन नाचायलाही कमी करत नाहीत ना?

आता हेच लोक  मिराज २००० विमानं चाळीस वर्षांपूर्वी घेतली म्हणूनच हा हल्ला करता आला असं म्हणून मोदी सरकारचं श्रेय काढून घ्यायला पहात आहेत. मोदी स्वत: लढायला गेले होते काय? असा प्रश्न विचारत आहेत. प्रत्येकाने आपलं काम केलं की देश मोठा होतो, संबंधीत सर्व आपापलं काम रात्रंदीवस जागून करीत असताना असलं गरळ ओकणार्‍यांना म्हणूनच आपण उघडं पाडलं पाहिजे, त्याना त्याची जागा दाखऊन दिली पाहिजे.

मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि एक खमका पंतप्रधान देशाला मिळाला असा भास झाला होता, आता साडेचार वर्षानी त्याची खात्री पटली आहे. संभवामी युगे-युगे म्हणणारा श्रीकृष्ण त्यांच्यामागे आहेच, आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. येत्या निवडणूकीत त्याना मत दिलंच पाहिजे. बाकी बॅंक खात्यात पंधरा लाख कधी जमा होणार म्हणून विचारणार्‍यांना मी सांगू इच्छितो की, काल पाकमध्ये घुसून हवाईदलाने हल्ला केला त्या वेळी मी झोपेत होते तरी त्याच क्षणी माझ्या खात्यात पंधरा लाख जमा झाले.

1 comment:

  1. आजच्या हवाई हल्ल्याकडे `सर्जिकल स्ट्राईक`पेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं..ते म्हणजे युद्ध शत्रूव्याप्त भागात होणं सामरिकदृष्ट्या केव्हाही महत्त्वाचं. आजवर भारतीय भूमीवर दहशतवाद्यांना घुसवित पाकिस्तान भारताला जेरीस आणू पाहात होते. आता खुद्द आपल्याच भूमीवर भारतीय सैन्य पोहोचण्यानं त्यांना बसलेला धक्का मोठा आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे बालाकोट लक्ष्य होणं हा आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येईना अशी त्यांची अवस्था झाली आहे, हे नक्की. त्यामुळे इथं यश हे जिवित हानीत मोजण्यापेक्षा शत्रूचं मनोधैर्य खचवणं यावर नेमकं मोजता येण्याजोगं आहे. गंमत म्हणजे, एक दिवस आधीच त्यांच्या लष्करप्रमुखानं हवाईदल प्रमुखांशी सल्ला-मसलत करुन आपण सज्ज असल्याच्या वल्गना केल्या होत्या.... म्हणूनच, भारतीय वायुदलानं केलेल्या या अतुलनिय कामगिरीचा अभिमान वाटतो. या साऱ्या परिस्थितीकडे राजकारणाचा चष्मा काढून पाहिलं तर एक राष्ट्र म्हणून आपल्यात असणाऱ्या शक्तीची जाणीव सर्वांना व्हायला हरकत नाही. पुलवामातील हुतात्म्यांना तर ही श्रद्धांजली तर आहेच पण आजवर आपण ज्याचे बळी ठरलो त्या बोटचेपे धोरणांनाही श्रद्धांजली आहे. हा नवा, समर्थ भारत आहे आणि हाच जगाला संदेश आहे. जय हिंद!

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates