मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतरही राजकारण्यांचे डोळे उघडलेले नाहीत. किंबहूना त्यांच्या मग्रुरीला अधिक उधाण आले आहे असेच म्हणावे लागेल.
शहीद हेमंत करकरेंच्या हौतात्म्या बद्दल संशय घेणारे अंतुले आता केंद्रीय मंत्रिमंडळातून हद्दपार केले जातील पण हे भ्रष्टाचारी माजी मुख्यमंत्री एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पायउतार झाल्यावर पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कसे घेतले गेले ? स्वरुपसिंग नाईक हे महारष्ट्राचे दुसरे मंत्री एका महीन्याच्या तुरूंगवासा मुळे मंत्रिमंडळातील स्थान गमावून बसले होते ते पुन्हा मंत्रिमंडळात आले कसे ? तीच गोष्ट नवाब मलिक यांची. आता अत्राम कधी स्थानापन्न होतात ते पहायच. एकदा काढून टाकल्यावर सरकारी नोकराला पुन्हा कामावर घेतलं जात नाही, हे मंत्री कसे येतात ? खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, अडाणी, अशिक्षीत अश्या मंडळिनी भरलेली विधीमंडळे आणि संसद पाहून आपण ' मेरा भारत महान ' कसं म्हणायच ?
राजशिष्ठाचाराप्रमाणे मान मिळाला नाही म्हणून दुसरे एक मंत्री पतंगराव कदम थयथयाट करत पोलिस अधिक्षकांचा पतंग कापायला निघालेत. तेव्हा जन क्षोभाचा वन्ही पेटवतच ठेवला पाहीजे म्हणून हा लेखन प्रपंच.
ले. नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment