सचिनने आपले ४१ वे कसोटी शतक शहीदांना आणि मुंबईतील जनतेला विनम्रपणे अर्पण केले आहे. ज्यांचे आप्तस्वकीय त्या घमासानात मारले गेले त्यांचं दुःख डोंगरा एवढं आहे, पण या शतकी खेळीने आणि भारताच्या विजयाने ते तसूभर तरी कमी झालं असेल असं सचिनने म्हटलं आहे. टिम इंडीयाने विजयश्री खेचून आणली ती सुद्धा सैनिकी बाण्यानेच. भारताच्या खेळाने आनंद झालाच पण सचिनच्या वक्तव्याने जखमांवर एक हळुवार फूंकर नक्कीच घातली गेली आहे.
धोनी आणि टिम इंडीयाने आपल्या मानधनातील रक्कम शहीदांसाठी देण्याचं नक्की करून एक चांगला पायंडा पाडला आहे. विजय आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असले तरी पाय जमीनीवरच आहेत हे टिम इंडीयाने दाखवून दिले आहे. या उलट सर्व पक्ष संसदेत दहशतवादा विरूद्ध एकत्र आले पण लगेच दुसर्या दिवशी संसदेवरच्या हल्ल्यातील हुतात्म्याना श्रद्धांजलीच्या वेळी केवळ १० खासदार उपस्थीत राहीले आणि इतरांनी बलिदानालाही काडीची किंमत दिली नाही, या अतिरेकाला काय म्हणायचं ?
ता.क. दि. १५/१२/२००८ रोजी नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात रामुफेम माजी मुख्यमंत्री विलास देशमुख गैरहजर.
ले. नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment