अंटार्टीकाचे सर्वानाच कोण कौतुक ! तीथलं हवामान, तीथलं बर्फ, वारे सगळच काही और. आपल्या भारतात सुद्धा त्याहून विषम परिस्थीती आनुभवायला मिळते ती जम्मु-काश्मीरच्या लडाख विभागात. कारगील युद्ध ज्या भागात लढलं गेलं त्या द्रास-बटालीक क्षेत्रात सन २००५ मध्ये जगातील सर्वात कमी -६० ( वजा साठ ) अंश तपमान नोंदलं गेलं. लेहला नोहेंबरमध्ये दिवसा ३ ते ४ अंश तर रात्री - ७ ते - ८ अंश असलेलं तपमान फेब्रुवारीत रात्रीचं -१० ते - ४० एवढं खाली घसरतं. कसं असेल हे गोठलेलं लडाख ? काटा आला ना अंगावर ? जायचय गोठलेल्या लडाखला ? झंस्कारच्या स्तब्ध झालेल्या प्रवाहावरून चालायचय ? आम्ही पण तुमच्याशी हितगुज करायला आलोय असं तीथे जाऊन आपल्या जवानांना आश्वस्थ करायचय ? निसर्गाचा एक अविस्मरणीय चमत्कार पहायला चला तर मग याच हिवाळ्यात. आपल्यासारख्या जिप्सींसाठी गेली १३-१४ वर्षे सातत्याने लडखवारी करणारे श्री. आत्माराम परब या वर्षी आपणाला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. अधिक माहितीसाठी ९८९२१८२६५५ / ९३२००३१९१० वर संपर्क साधावा.
नरेन्द्र प्रभू
nice one.
ReplyDelete