जनक्षोभापुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीही खुर्ची गेली, आता केंद्र सरकार कणखर पाऊल उचलेल आणि जनतेला मोकळा श्वास घेता येईल असं वाटत असताना नेता निवडीचा घोळ देशमुख, हसतमुख, रडतमुख करत घालुन जे नाटक केलं गेलं त्याला तोड नाही.
पोलीसाना बुलेटप्रुफ म्हणुन जी जाकीटं दिली जातात ती कुचकामी आहेत ती बदला असा आग्रह एन्काउंटर स्पेशालिस्ट साळसकरांनी केला होता. पण या निगरगट्टानी त्याला दाद दिली नाही त्यानंतर साळसकरांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर सरकारने समिती नेमुन पुन्हा तश्याच प्रकारची जाकीटं दिली आणि तीच घालुन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे , अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे विजय साळसकर ( आणखी किती कामी येणार कोण जाणे ! ) शहीद झाले.
या दोन घटनांवरुन हे सिध्द होतं की पोलीसांचे आणि लोकशाहीचे खुन हे राज्यकर्तेच पाडताहेत आपण ऊगाच शेजार्याना नावं ठेवतो. एवढं झाल्यावर एक नवी सकाळ होईल असं वाटत होतं पण रात्र आणि दिवसही वैर्याचाच आहे राजाने झोपल्याचं सोंग घेतलेलं आहे तेव्हा पुढील अफवांवर विश्वास ठेऊ नका.
१) नैतिक जबाबदारी म्हणुन राजीनामा दीला.
२) दहा कोटी जनतेच्या सुक्षेला प्राधान्य.
३) सर्वच पक्षांचे निवडणुक जाहीरनामे.
४) हि यादी न संपणारी आहे .
ले. नरेन्द्र प्रभू
आजुन ही आतंगवादी मुंबईत असण्याची शक्यता आहे,मुंबई मधे अनेक बांगलादेशी बांधकाम व्यवसायात कम करतात . सरकारने कठोर कारवाई करणे जरुरी आहे , मुबई मधे पर प्रातीयाचे लोंढे येतात ,त्यावर कोठलेच बंधन नाही. व ते भारतीय आहेत का ह्याचा ही पत्ता नसतो. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली मुंबई व महाराष्ट्राचा हे राजकरणी कत्तलखाना करतील. मराठी माणसा सावध राहा.
ReplyDelete