21 February, 2019

पाकिस्तानला सर्वात मोठा आर्थिक दणका
भारताने पाकिस्तानला निर्यात करण्यात येणार्‍या मालावर २००% ड्युटी लावली आहे. आधीच कंगाल झालेल्या पाकला याची जबरदस्त किंमत मोजावी लागत आहे. पुलवामामध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याची किंमत पाकला  अनेक प्रकारे भोगावी लागणार आहे.

दरम्यान पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक शेतकऱ्यांनी आपला माल पाकिस्तानला न विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील पेटलावद येथील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. परंतु आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो सडले तरी चालतील पण पाकिस्तानला पाठवणार नाहीत असा निर्णय घेऊन इतर शेतकऱ्यांनाही आवाहन केले आहे. पाकिस्तानमध्ये येथील टोमॅटोला खूप मोठया प्रमाणात मागणी असते. दररोज ७० ते ९० टोमॅटोचे ट्रक भारतातून पाकिस्तानात पाठवले जात होते. १० ते २० रुपये प्रतिकिलो विकले जाणारे टोमॅटो ह्या निर्णयामुळे पाकिस्तानात आता प्रति किलोला १८० रुपये एवढ्या वाढीव दारात विकत घेतले जात आहेत. एवढेच नाही तर इतर भाज्या, फळे ,बटाट्याचे दरही वाढलेले असल्याचे सांगितले आहे.

भाज्याप्रमाणेच पाकिस्तानात सोन्याचे देखील चढ्या दराने आकारण्यात आले आहेत. ६७ हजार रुपये प्रति तोळा सोन्याची विक्री केली जात आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या सिमेंटचे ६०० ते ७०० कंटेनरही भारतातील व्यापाऱ्यांनी परत पाठवले आहेत.

सरकार आणि सामान्य जनता असे प्रयत्न करत असताना आपल्याच देशातले पुरोगामी दहशतवादी मात्र पुन्हा एकदा पाकची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा सफाया झाल्याशिवाय ही कारवाई पुर्णत्वास जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा असहीष्णूता, आणीबाणी असली भाषा केली जाऊ शकते, कागदी विमानं उडवली जाऊ शकतात. तेव्हा सावध होण्याची हिच वेळ आहे.

बाकी सरकार खंबीरपणे पाकिस्तानला धडा शिकवणारा आहे नक्की.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates