27 January, 2019

जगातील सर्वात उंच बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईनभारत चीन सीमारेषेवर असलेली जगातील सर्वात उंचबिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईनचं काम जोरावर असून ते २०२२ सालापर्यंत पुर्ण होईल. हिमाचल प्रदेश मधल्या मंडी, कुल्लू, मनाली, केलॉन्ग मधून प्रवास करीत ही रेल्वे जम्मू-काश्मिरच्या लेह-लडाख पर्यंत पोहोचणार आहे.           

२७ जून २०१७ रोजी तत्कालिन रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते सदर रेल्वेलाईन बांधणीचा शुभारंभ लेहामध्ये संपन्न झाला होता.  

या प्रकल्पाचे महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.  

1.      ३० रेल्वे स्थानकं असलेल्या बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्गावर लेह, कारू, उप्शी, दारचा, कोकसर, केलॉन्ग, मनाली, मंडी आणि सुरेंद्रनगर अशी महत्वाची स्थानकं असतील.

2.      ४६५ किमी लांब असलेली ही जगातील सर्वात उंच रेल्वे लाईन असेल.  समुद्र सपाटीपासून १७,५८५ फूट उंचीवरचं यातलं सर्वात उंचीचं स्थान असेल.

3.      या मार्गातला ५२% भाग हा भुयारातून जाणारा असून २७ किमीचा बोगदा हा सर्वात लांब बोगदा असाणार आहे, तर सर्व बोगद्यांची लांबी २४४ किमी. होणार आहे. या प्रकल्पात एकूण ४०० छोटे आणि १२४ मोठे पुल असणार असून ७४ बोगदे खोदले जाणार आहेत       

4.      प्रकल्प पुर्ण झाल्यावर इथली ट्रेन ताशी  ७५ किमी वेगाने धावेल आणि मग नवी दिल्ली ते लेह हे अंतर ४० तासांऐवजी २० तासांवर येईल. 

5.      ही रेल्वे लाईन फक्त प्रवाशांनाच नव्हे तर भारतीय लष्कराच्या दृष्टीनेही फार महत्वाची ठरणार असून लेह-लडाखच्या विकासात मोलाची भर घालणार आहे.

6.      लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाचा, लडाखला १२ महिने जोडणारा आणि पाक अधीकृत काश्मिरपासून दूर असलेला हा मार्ग वेगाने पुर्ण करण्यात मोदी सरकार मोलाची कामगिरी बजावत आहे.२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.
  

No comments:

Post a comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates