सगळ्याचाच धंदा होत चाललाय. साहित्य, संस्कृती खेळ काही म्हणजे काही या मधून सुटत नाही. साहित्य संमेलनाची धुळवड झालीय, संस्कृतीच्या नावाखाली दहशत माजवली जाते आणि आता खेळाचा धंदा झालाय. क्रिडा साहित्याचा धंदा नव्हे प्रत्यक्ष खेळाचाच धंदा. आयपीएल फक्त तीन वर्षातच राक्षसासारखं वाढलं. त्याच्याशी संबंधित हितसंबंधीलोक एवढे मातले कि त्याना कशाचच सोयर-सुतक वाटेनासं झालं. धनदांडग्याना कायद्याची, नितीमत्तेची चाड कधीच नसते पण स्वतःचा स्वार्थ पणाला लागला तरी हरकत नाही पण मी म्हणेन तीच पुर्व अशी सत्तेची गुर्मी आणि गर्मी चढली की त्याचा भस्मासूर होतो. या खेळात आता प्रत्यक्ष लक्ष्मीनेच अप्सरेचं रुप धारण केलय त्यात पहिला बळी शशी थरुर यांचा गेला, त्यांच्या पाठोपाठ ललित मोदी रांगेत उभे आहेत. त्यांच्याही मागे मोठी रांग असावी पण सगळ्यांचेच हात काळे असल्याने आता ही मंडळी एक तर हात वर करताहेत किंवा संसदीय समितीच्या बुरख्याआड हे संपुर्ण प्रकरण दडपू पहात आहेत. या प्रकरणाची जर न्यायालयात चिरफाड झाली तर सर्वांचाच बुरखा फाडला जाईल याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे.
राज्यकर्ते हे जनतेचे प्रतिनिधी असतात पण हे, ते राज्यकर्ते आणि जनता सगळेच विसरलेले आहेत. म्हणूनच पुर्वी दडून केल्या जाणार्या गोष्टी आता खुलेआम केल्या जात आहेत. आयपीएलवरचा करमणूक कर रद्द करणं ही कर चोरीच आहे आणि ती प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच करताहेत. काळ्याबाजारात विकल्या जाणार्या तिकिटांवर नको पण मुळ किंमतीवर तरी कर वसूल करा. नागरी विमानवाहतूक मंत्री आपला आयपीएलशी काही संबंध नाही असं भासवत आहेत पण त्यांचीच मुलगी एअर इंडियाच अख्ख विमान आयपीएलसाठी चेन्नईला घेऊन जाते ते कशाच्या जोरावर? तीच बाई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना रात्री उशीरापर्यंत गोंगाट करण्याची परवानगी मागत आहे.
महाराष्ट्रात बारबालांवर बंदी आहे पण आयपीएलच्या सामन्याच्यावेळी स्टेडियमवरच दारू सर्व्ह केली जाते, चिअर गर्ल्स नाचवल्या जातात, प्रदुषणात भर घालण्यासाठी आतषबाजी केली जाते हे कशाचं लक्षण? उद्या स्ट्रॅटेजिक टाईम मध्ये मैदानातच लावणी किंवा भांगडानृत्य झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
अवघड जागचं दुखणं झालंय आयपीएल.. :)माणसं वेडी झाली आहे क्रिकेटसाठी. छाती ठोक पणे पैसे खात आहेत. सिएअजी रिपोर्ट वाचल्यावर पण निर्ढावलेल्या सरकारी लुच्च्या नेत्यांना काही लाज वाटत नाही.. ठेवीले अनंते तैसेची रहावे... काय बोलणार?
ReplyDeleteही राजकारण्यांची मारामारी आहे. हाकीचे वांगे केल्यावर क्रिकेटची पाळी अपेक्षित होतीच.
ReplyDeleteमहेंद्रजी नमस्कार,
ReplyDeleteमुळात हे क्षेत्र राजकारण्यांचं नाहीच. बंदी घालायचे झालीच तर ती राजकारण्यांनी खेळात लुडबुड करू नये म्हणून घातली पाहीजे.