skip to main |
skip to sidebar

“
हे झाड कुठचं ओ ?”
हा प्रश्न तसा साधा पण त्यातल्या मालवणी भाषेतल्या हेलाने माझं लक्ष वेधून घेतलं. या बाई थेट मालवणहून सहलीला आल्या असतील असा माझा समज झाला. पन्हाळा आणि पुढे दांडेली अभयारंण्यात फिरताना मात्र आम्ही कायमचे मित्र झाले. सारंगकाका आणि ताई त्या नंतर अनेक सहलींना भेटल्या आणि ऋणानुबंध वाढत गेले. काल त्यांनी घेतलेला D70 कॅमेरा दाखवायला आल्या. येताना कोकणातल्या फणसाचे गोड गरे आणि मालवणी खाजं आणायला विसरल्या नाहीत. मालवणी माणसाला फणसाची उपमा देतात, बाहेरून काटे आणि आतून गोड. पण या सबाह्य गोड स्वभावाच्या. महापालिकेच्या शाळेतून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या पण घरात बसून राहील्या नाहीत. झाडं फुलं यांची खुप आवड, फिरण्याची आवड, जंगलातून फिरताना एखादा प्राणी दिसला की एवढ्या खुश होतील की सांगता सोय नाही. एकदा असाच ताडोबात वाघ दिसला तर या लहानमुलासारख्या उत्साहाने ओरडल्या “
काय नाय वाघ...!, दिसता बघा कसो...! बाबा माज्या केदो मोठे......, जंगलचो राजोच तो...!”
त्यांच्यातलं लहान मुल अजून जागं आहे. वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मधूमेह, स्लिपडीस्कचा त्रास असूनही “
शिरापडो तेच्यार”
म्हणत, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, आपण आनंदी राहत आणि इतरांना आनंद देत त्या त्यांच्या ‘
बालसुलभ’
स्वभावाप्रमाणे अनेक क्षेत्रात अजून खुप शिकायचं आहे म्हणून रस घेतात आणि प्रश्न विचारतात. आता फोतोग्राफी शिकायची आहे म्हणून म्हणत होत्या. हे असं जगलं पाहीजे. सारंगताईंकडून जगण्याची कला शिकली पाहीजे.
सारंगताईनां मी भेटलो आहे.
ReplyDeleteसौ. सुषमा नारायण सारंग या बोरीवलीला राहतात.
२००७ म्ध्ये पिरामल कलादालनात लावलेल्या माझ्या 'गंगाजल' या छायाचित्र प्रदर्शनाला श्री व सौ. सारंग आवर्जुन आले होते. 'लोकसत्ताच्या' प्रसिध्दीमुळे त्यांना 'गंगाजल' छायाचित्र प्रदर्शनाची माहिती समजली होती. जेष्ठनागरिक आणि शारिरीक त्रास असतानाही बोरीवलीहून नरिमन पाँईटला पिरामल कलादालनात आले होते. तासभर भरभरून बोलत होते. त्यांच्या आभिप्रायाने माझ्या मनाला उभारी आली. पुढे एक दोनदा बोरीवलीला त्यांच्या घरी जाण्याचा योगही आला. बहुदा भटकंतीने त्यांनी आपल्या शारिरीक व्याधीवर ताबा मिळवला असावा.
गंगानदीच्या उगमस्थळाला 'गोमुखाला' भेट देण्याची ईच्छा दोघा उभयतांनी व्यक्त केली होती. आता तर कँमेराही घेतलाय म्हणजे त्या गोमुखाच छायाचित्रणही लवकरच करतील याची मला तरी शंका नाही. शारीरीक व्याधींच काय घेऊन बसताय ? आशा निसर्गवेडयांच काही सांगता येत नाही !
विजयजी नमस्कार,
ReplyDeleteमनाने सदैव तरूण असणारी ही माणस हाच आताच्या काळातला प्राणवायू आहे. त्यांच्या वागण्याने आपल्यासारख्यांना पुन्हा नव्याने उभारी येते हे खरच.
सारंगताईंचं सगळं लिहिलत,पण त्यांच्या शीघ्र-कवित्वाविषयी लिहायला विसरलात ! त्यांची मालवण वरची कविता blog वर टाका की !
ReplyDeleteशोभाजी नमस्कार,
ReplyDeleteआपण म्हणता ते बरोबर. सारंगताईंची कविता हा विषय राहून गेला पण तो एक स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे लिहिन कधीतरी. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
Chhan aahe blog. Hya Srangtainch mulga Dnyanesh sarang aahe na. Mi tyaala aani tyamule Sarang kakinna olakhato.
ReplyDeleteविकास नमस्कार, ज्ञानेशना मी सुद्धा ओळखतो. धन्यवाद.
ReplyDelete