लडाखला जो एकदा जातो तो लडाखच्या प्रेमातच पडतो हे सत्य आहे. पहिल्यावेळी मी गेलो तो मनाली मार्गे. दुसर्यावेळीही मनाली मार्गेच पण नंतरच्यावेळी श्रीनगर मार्गे जाण्याचा योग आला. श्रीनगर हे नंदनवन असूनही मला कधी एकदा जोझिला खिंड पारकरून लडाख प्रांतात प्रवेश करतो असं झालं होतं. लडाख आहेच तसं महाराजा...!
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
गेल्या वर्षी जोझी-ला मार्गे द्रास- कारगिल - लेह करून आलो. बातमी चांगली आहे पण जोझी-ला पार करून जाण्याची सर्व मज्जा निघून जाईल असे वाटते. शिवाय तिथे इतका बर्फ पडतो की बोगदयाची तोंडे बंद झाली तर काय करणार?
ReplyDeleteबरं जोझी-ला बायपास बनवला पण पुढच्या ३-४ 'ला' म्हणजे पासेस चे काय??? रस्ते नीट ठेवणे सोपे काम नाही तिकडे.
रोहन नमस्कार,
ReplyDeleteआपल्या लडाखवारीची सर्व पोस्ट मी वाचली आहेत, प्रतिक्रीया सुद्धा नोंदवली आहे. आपण म्हणता ते खरं आहे लडाखची खरी मजा जोझिला खिंडीपासूनच सुरू होते. पण हीच खिंड सहा-सात महिने आपल्याला अडवून धरते, शिवाय लडाखशी संपर्क तूटतो तो वेगळाच.