काल ‘से नो टू सीओटू’ ही बातमी लोकसत्ता मध्ये वाचली आणि मकरंद जोशी या माझ्या मित्राची आठवण झाली. व्यवसायाने आय्.टी. इंजिनीअर असलेला हा माझा मित्र कंपनी विमानाच तिकीट देत असताना शक्य असल्यास हट्ट करून रेल्वेने जातो, सार्वजनिक वाहनातूनच प्रवास करतो. आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाबाबत तो कमालीचा सतर्क आहे. इथे या पृथ्वीवर येऊन घाण वाढवायचा आपल्याला काय अधिकार? असा त्याचा प्रश्न असतो. ग्लोबल वॉर्मिंगला कारण दूसरा कुणीतरी आहे असं आपण सतत मानत आलो आहोत. पण आपण रोज किती प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतो ते पहायचं असेल तर Say No to CO2 या संकेतस्थळाला भेट द्या दुध का दुध पानी का पानी हो जायेगा!
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment